Arvind Kejriwal Bail : देहलीचे मुख्‍यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा जामीन स्‍थगित !

देहलीतील मद्य घोटाळ्‍याच्‍या प्रकरणासंदर्भात दिल्ली उच्‍च न्‍यायालयाचा निर्णय !

देहलीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल

नवी देहली – देहलीचे मुख्‍यमंत्री अरविंद केजरीवाल यांना येथील सत्र न्‍यायालयाने संमत केलेला जामीन उच्‍च न्‍यायालयाने स्‍थगित केला आहे. त्‍यामुळे केजरीवाल हे बाहेर येऊ शकणार नाहीत. २० जून या दिवशी राऊस एव्‍हेन्‍यू सत्र न्‍यायालयाने केजरीवाल यांना ‘मनी लाँडरिंग’ (पैशांची अफरातफर) प्रकरणात जामीन संमत केला होता. यावरून ‘ईडी’ने (अंमलबजावणी संचालनालयाने) ४८ घंटे थांबण्‍याची मागणी केली होती; मात्र सत्र न्‍यायालयाने ही मागणी फेटाळून लावली.

यानंतर ईडीने उच्‍च न्‍यायालय गाठले. त्‍यावर न्‍यायालयाने सत्र न्‍यायालयाच्‍या निर्णयाला २१ जूनला स्‍थगिती दिली. त्‍यामुळे अवघ्‍या २४ घंट्यांच्‍या आत केजरीवाल यांचा जामीन रहित झाला आहे.