चित्तवृत्तींचा निरोध करणे म्हणजे योग !

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

‘चित्तवृत्तींचा निरोध करणे, म्हणजे योग. दुसर्‍या शब्दांत सांगायचे झाल्यास चित्तातील संस्कार नष्ट करणे, म्हणजे योग. अशी योगाची व्याख्या आहे. चित्तवृत्तींना विरोध करण्यासाठी स्वतः साधना करावी लागते आणि जनतेलाही शिकवावी लागते.

योगासने केवळ शारीरिक व्यायाम नसून आध्यात्मिक व्यायाम आहेत. मानसिक स्तरावर कार्य करणार्‍या धर्मद्रोह्यांचे कार्य आणि नाव काही वर्षांतच कुणाच्या लक्षात रहात नाही. याउलट ऋषींनी सांगितलेले अनंत काळापर्यंत अस्तित्वात रहाते; कारण त्यांच्यामध्ये ‘ॐ’ची निर्गुणाची शक्ती आहे !’

प्रतिदिन साधना करणे म्हणजे योग !

‘काही जण वर्षातून एक दिवस ‘योग (योगासन) दिवस’ म्हणून साजरा करायला सांगतात. याउलट सनातनचे साधक एक दिवस नाही, तर ३६५ दिवस ‘योग’ म्हणजे साधना करतात !’

– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले

‘ज्ञानविज्ञानतृप्तात्मा कूटस्थो विजितेन्द्रियः ।
युक्त इत्युच्यते योगी समलोष्टाश्मकाञ्चनः ।।

– श्रीमद्भगवद्गीता, अध्याय ६, श्लोक ८

अर्थ : ज्याचे अंतःकरण ज्ञान-विज्ञानाने तृप्त आहे, ज्याची स्थिती निर्विकार आहे, ज्याने इंद्रिये पूर्णपणे जिंकली आहेत आणि ज्याला दगड, माती अन् सोने समान आहे, तो योगीयुक्त, म्हणजे भगवंताला प्राप्त झालेला आहे, असे म्हटले जाते.

(साभार : मासिक ‘संतकृपा’)