पोटाची चरबी न्यून करण्याचे विविध योगाभ्यास !
१. कपालभाती, अग्नीसार, उड्डीयान, वमन आदी शुद्धीक्रिया केल्याने पोटाची चरबी न्यून होते.
२. सूर्यनमस्कार नियमित शास्त्रशुद्धरित्या घातल्याने पोटाची चरबी नियंत्रणात रहाण्यास साहाय्य होते.
३. सेतूबंधासन, चक्कीचलनासन, भुजंगासन, धनुरासन, हलासन, विमानासन, वक्रासन, पश्चिमोत्तानासन, सौंदर्यकटीआसन, ताडासन, हस्तपादासन, पादहस्तासन, पवनमुक्तासन, नौकासन, वीरभद्रासन, त्रिकोणासन, पवनमुक्तासन आदी पोटावरील विविध आसनांमुळे पाेटाची चरबी न्यून होते.
४. पाठीवर झोपून हळू हळू पाय वर नेत जेवढा वर नेता येतो तेवढा नेऊन १० अंक म्हणेपर्यंत थांबणे आणि हळू खाली आणणे, हीच क्रिया दुसर्या पायाने करणे, यामुळे पोटावरील चरबी न्यून होते.
५. दोन्ही पाय पोटाशी घेऊन होडीप्रमाणे वर खाली हालचाल करणे, तसेच दोन्ही पाय डाव्या आणि उजव्या बाजूला नेणे आदी प्रकारांमुळेही पोट न वाढण्यास लाभ होतो.
६. ‘जठर परिवर्तन’ या प्रकारमध्ये पाठीवर झोपून पुढीलप्रकारे पायांच्या हालचाली केल्यास पोटाची चरबी न्यून होते. या सर्व हालचाली पाठीवर झोपून करायच्या आहेत. झोपून एका पायाने आणि दोन्ही पायांनी सायकलिंग करणे, झोपून दोन्ही पाय ‘क’ च्या आकाराप्रमाणे फिरवणे, तसेच उलटा ‘क’ काढल्याप्रमाणे पाय फिरवणे, एकेका पायाचा गुडघा दुमडून नाकाजवळ घेणे, एकेका पायाने ताशावर काठी मारल्याप्रमाणे पाय वर-खाली करणे, गुडघ्यात दुमडून एक एक पाय पोटाजवळून गोल फिरवणे, तसेच दोन्ही पाय उजव्या आणि नंतर डाव्या बाजूने गोलाकार फिरवणे, दोन्ही पाय गुघ्यात दुमडून एकदा उजव्या आणि एकदा डाव्या बाजूला नेऊन गुडघा भूमीला टेकवणे.
– वैद्या सुश्री (कु.) माया पाटील, सनातन आश्रम, देवद, पनवेल.