योगाभ्यास करतांना हे करा !

१. साधारणपणे वयाच्या दहाव्या वर्षापासून मुले-मुली योगासने करण्यास प्रारंभ करू शकतात.

२. योगाभ्यास करतांना नामजप करावा किंवा देवता, गुरु आदींविषयी विविध भाव ठेवावा !

३. योगासनांसमवेत आहार, झोपणे यांसंदर्भातील आयुर्वेदाचे नियम पाळल्यास योगासने करण्याचा पूर्ण लाभ होतो. त्यामुळे सूर्याेस्तापूर्वी भोजन करणे, लवकर झोपणे, लवकर उठणे हे नियमही पाळले पाहिजेत.

४. योगासने करण्यासाठी प्रातःकाल अधिक चांगला असतो. सायंकाळीही ती करण्यास हरकत नाही. योगासनांसाठी जागा शांत, स्वच्छ, हवेशीर आणि मनाला प्रसन्न वाटेल अशी असावी.

५. व्यायाम प्रत्येक दिवशी थोडा थोडा वाढवावा आणि स्वतःला झेपेल एवढाच करावा.

६. शक्यतो आसने अनशापोटी करावीत अथवा पेय घेतल्यास किमान अर्धा घंटा तरी जाऊ द्यावा. जेवणानंतर किमान चार घंटे झाल्यावर योगाभ्यास करावा.

७. व्यायामानंतर २ मिनिटे सुक्या अंगपुसणीने किंवा हातांनी सर्व शरीर रगडून घ्यावे. यामुळे व्यायामामुळे पेशींमध्ये वाढलेला वात न्यून होतो, तसेच घर्षणातून एकप्रकारचा विद्युत्प्रवाह निर्माण होऊन तो शरिरातील रोगांना नष्ट करतो.

८. आसनांची आदर्श स्थिती साधेपर्यंत, विशेषतः लवचिकपणा येईपर्यंत, आसनांच्या मध्यंतरात थोडी विश्रांती घ्यावी.

९. योगासने करून झाल्यावर व्यक्तीला शांत, प्रसन्न, उत्साही आणि आनंदी वाटले पाहिजे.

(संदर्भ : विविध संकेतस्थळे)