पालखेड (छ. संभाजीनगर) येथे थोरले बाजीराव पेशवे यांच्या स्मारकास अनुमती !

रक्ताचा थेंबही न सांडता निजामाला केले होते पराभूत !

थोरले बाजीराव पेशवे ‘स्वराज्य साम्राज्यक’ !

पुणे – वर्ष १७२८ मध्ये पालखेडच्या लढाईमध्ये थोरले बाजीराव पेशवे यांच्याकडील मराठा सैन्य निजामाच्या सैन्याहून अधिक होते; मात्र पेशव्यांनी निजामाच्या सैन्याचे पाणी रोखले. संपूर्ण रसद तोडून निजामाला कोंडीत पकडले. निजामाला शरण येण्यास भाग पाडले आणि तहास मान्यता द्यावी लागली. रक्ताचा थेंबही न सांडता जिंकलेल्या ऐतिहासिक लढाईच्या ठिकाणी आता थोरले बाजीराव पेशवे यांचे स्मारक निर्माण करण्यात येत आहे. ‘पालखेड स्मारक समिती’ला याविषयीची अनुमती मिळाली आहे.

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पालखेड येथे थोरले बाजीराव पेशवे यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्याची कल्पना समितीने दीड वर्षापूर्वी मांडली होती. जिल्हाधिकार्‍यांनी समितीला आवश्यक त्या अनुमती दिल्या आहेत. स्मारकाच्या कामाला प्रारंभ करण्यात येईल. स्मारकासाठी पालखेड ग्रामपंचायतीने जागा दिली आहे.