भामचंद्र डोंगरावर (तालुका) खेड) वारकरी विद्यार्थ्यांना टोळक्यांकडून मारहाण !

खेड (जिल्हा पुणे) – तीर्थक्षेत्र भामचंद्र डोंगरावर (ता. खेड) आलेली मुले आणि मुली यांना अश्लील चाळे करण्यापासून हटकले. त्याचा राग धरून एका टोळक्याने वारकरी विद्यार्थ्यांना मारहाण केली. या घटनेचा ‘भामचंद्र डोंगर सप्ताह समिती’ने निषेध केला असून या तरुणांच्या टोळक्यांवर कारवाईची मागणी केली आहे. या प्रकरणी ४ आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.

वासुली परिसरामध्ये असणार्‍या भामचंद्र डोंगराला जगद्गुरु तुकाराम महाराज यांची अभ्यासभूमी आणि ‘साक्षात्कार भूमी’ म्हणून ओळखले जाते. या डोंगरावर वारकरी संप्रदायातील विद्यार्थी अभ्यासासाठी येत असतात. १६ जून या दिवशी डोंगरावर एक जोडपे अश्लील चाळे करत होते. त्यांना विद्यार्थ्यांनी हटकले. तेव्हा त्या युवकाने विद्यार्थ्यांना मारहाण करत शिवीगाळ केली. पुन्हा त्या युवकाने संध्याकाळी मित्रांना बोलावून विद्यार्थ्यांना मारहाण केली. मारहाणीमध्ये एका विद्यार्थ्याचा पाय मोडला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार चालू आहेत. (तीर्थक्षेत्रांचे पावित्र्य जपण्यासाठी पोलीस कृती करणार आहेत का ? – संपादक)