बेंगळुरू येथे अॅमेझॉनच्या पार्सलमध्ये सापडला जिवंत कोब्रा साप !
अॅमेझॉनने क्षमा मागत ग्राहकाला पैसे केले परत !
बेंगळुरू (कर्नाटक) – येथे एका महिलेने ऑनलाईन मागवलेल्या वस्तूच्या पार्सलच्या खोक्यामध्ये जिवंत कोब्रा साप आढळला. महिलेने खोका उघडल्यावर त्यातून कोब्रा साप बाहेर आला; मात्र खोक्यावरील ‘पॅकेजिंग टेप’मध्ये तो अडकला. त्यामुळे कोणतीही हानी झाली नाही. नंतर स्थानिक लोकांनी सापाला पकडून सुरक्षित ठिकाणी सोडले. या प्रकरणी अॅमेझॉनने महिलेची क्षमा मागत तिचे पूर्ण पैसे तिला परत केले आहेत.
महिलेने आरोप केला की, अॅमेझॉनची खराब वाहतूक व्यवस्था, गोदामातील अस्वच्छता आणि देखभालीकडे दुर्लक्ष, यांमुळे ही घटना घडली असल्याची शक्यता आहे.