उत्तर आणि पूर्वाेत्तर भारत क्षेत्रातील हिंदुत्वनिष्ठांच्या ‘ऑनलाईन’ बैठकीचे यशस्वीपणे आयोजन !
‘१२ ते १८.६.२०२२ या कालावधीत रामनाथी (गोवा) येथे ‘हिंदु जनजागृती समिती’ने आयोजित केलेल्या ‘दशम अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशना’त उत्तर आणि पूर्वाेत्तर भारत येथून अनेक हिंदुत्वनिष्ठ सहभागी झाले होते. अधिवेशनाच्या वेळी त्यांनी रामनाथी (गोवा) येथे असलेला सनातनचा चैतन्यमय आश्रम पाहिला. अधिवेशनानंतर उत्तर आणि पूर्वाेत्तर भारत क्षेत्रातील हिंदुत्वनिष्ठांसाठी एका ‘ऑनलाईन’ बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यांपैकी काही जणांनी अधिवेशन आणि सनातन आश्रम या संदर्भात स्वतःचे अनुभव कथन केले. यातील काही अनुभव १९.६.२०२४ या दिवशी पाहिले. आज पुढील अनुभव पाहू.
या लेखाचा आधीचा भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/805487.html
१ ई. अधिवक्ता विभूती भूषण पलई, राऊरकेला, ओडिशा
‘अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशना’ची मी वर्षभर प्रतीक्षा करतो आणि पुढील अधिवेशन केव्हा होणार यासाठीही उत्सुक असतो. आम्हाला या अधिवेशनाच्या माध्यमातून राष्ट्र आणि धर्म यांच्यासाठी लढण्याची शक्ती मिळते. माझ्या मनात ‘आम्हाला ही जी शक्ती मिळाली आहे, ती इतरांनासुद्धा लाभावी’, असा विचार असतो. वर्ष २०१३ मध्ये अधिवेशन झाले होते. त्या वेळी ‘हिंदु धर्माच्या स्थितीत काही पालट होऊ शकतात’, असे मला वाटत नव्हते; मात्र आता माझ्यामध्ये तसा आत्मविश्वास निर्माण झाला आहे. आता मी या विशाल हिंदु संघटनांच्या कुटुंबाचा एक अंश झालो आहे. मी ओडिशातील २० गावांमध्ये बैठकांचे आयोजन करू शकतो, तसेच ५० पेक्षा अधिक अधिवक्त्यांना एकत्रित करून बैठकीचे आयोजन करू शकतो.’
१ उ. श्री. अनिर्बान नियोगी, कोलकाता, बंगाल.
‘अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशना’चे जे स्थान आहे, ते अत्यंत सकारात्मक ऊर्जा देणारे स्थान आहे. मी इतर ठिकाणचे आश्रम पाहिले आहेत; परंतु सनातनसारखा आश्रम कुठेच पाहिला नाही. हा आश्रम स्वर्गासमानच आहे. या अधिवेशनात येणारे पिता-पुत्र, उदा. मुंबईचे श्री. ईश्वर प्रसाद खंडेलवाल (राष्ट्रीय तसेच संस्थापक अध्यक्ष, लष्कर-ए-हिंद, ठाणे, महाराष्ट्र) आणि त्यांचे पुत्र अधिवक्ता खुश खंडेलवाल (संस्थापक, हिंदु टास्क फोर्स, ठाणे, महाराष्ट्र), तसेच देहलीचे अधिवक्ता (पू.) हरिशंकर जैन (संरक्षक, हिंदु फ्रंट फॉर जस्टिस तथा अधिवक्ता, सर्वोच्च न्यायालय, देहली) आणि त्यांचे पुत्र अधिवक्ता विष्णु शंकर जैन (प्रवक्ता, हिंदु फ्रंट फॉर जस्टिस तथा अधिवक्ता, सर्वोच्च न्यायालय) हे माझे प्रेरणास्थान आहेत.’
१ ऊ. अधिवक्ता आलोक मिश्रा, प्रयागराज, उत्तरप्रदेश.
‘या अधिवेशनात सहभागी झाल्यानंतर नकारात्मकतेचे समूळ निर्मूलन होते. आता माझ्या मनामध्ये ‘ही माझीच संघटना आहे. या अधिवेशनात सहभागी झालो, तर भविष्यात कार्य करण्यासाठी ऊर्जा मिळेल’, असा भाव निर्माण झाला आहे. परात्पर गुरुदेवांनी (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी) अत्यंत अनमोल कार्याशी आम्हाला जोडून घेतले आहे. त्यांच्या मार्गदर्शनातून आम्हाला कार्य करण्यासाठी पुष्कळ ऊर्जा मिळते. आम्ही तन-मन-धनाने ‘हिंदु जनजागृती समिती’शी जोडलो आहोत. रामनाथी, गोवा येथील सनातनचा आश्रम हे एक अत्यंत पवित्र तीर्थस्थान झाले आहे.’
१ ए. डॉ. शुभम् शुक्ला, लखनऊ, उत्तरप्रदेश.
‘मला या अधिवेशनात पुष्कळच सकारात्मक ऊर्जा प्राप्त झाली. परात्पर गुरुदेवांनी (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी) वैज्ञानिक परिभाषेत ज्या प्रकारे अध्यात्म प्रस्तुत केले आहे, ते पाहून माझी जिज्ञासा पूर्ण शांत झाली. ‘सृष्टीमध्ये होणारे पालट का होत आहेत ?’, त्याचे उत्तर अध्यात्मशास्त्राद्वारे दिले जाऊ शकते. मी आश्रमात असतांना मला कोणत्याही प्रकारचा सांसारिक ताण आला नाही. माझ्यासमोर अद्भुत साक्ष पाहून माझ्या मनातील सर्व शंका दूर झाल्या. संपूर्ण भारतातून आलेल्या कार्यकर्त्यांचे आचरण पाहून मला अचंबा वाटला. सनातनच्या आश्रमाप्रती त्यांची निष्ठा आणि कर्तव्यपरायणता अनुकरणीय आहे. माझी पत्नी डॉ. रोली आणि कन्या कु. काव्यासुद्धा पुष्कळ प्रभावित झाल्या. या अधिवेशनानंतर आम्हा तिघांमध्ये कितीतरी सकारात्मक पालट झाले. सर्व सनातनी लोकांनी आपापल्या क्षमतेनुसार सनातन धर्माचे पालन करून इतरांना प्रेरित करायला पाहिजे आणि समाजात छोटे छोटे सकारात्मक परिवर्तन आणण्यासाठी आरंभ करायला पाहिजे, तर मोठे परिवर्तन आपोआपच होईल.’
१ ऐ. श्री. विपुलेश त्रिपाठी, प्रयागराज, उत्तरप्रदेश
‘अधिवेशनात मला स्वयंशिस्त पहायला मिळाली आणि पुष्कळ गोष्टी शिकायला मिळाल्या. इथे आल्यापासून त्या मी आत्मसात करण्याचा प्रयत्न करत आहे. असे अधिवेशन अनेक ठिकाणी लहान-मोठ्या स्तरावर आयोजित व्हायला पाहिजे. मी प्रत्येक वेळी ‘हिंदु जनजागृती समिती’शी जोडून राहीन आणि सहकार्य करीन.’
१ ओ. अधिवक्ता आलोक तिवारी, प्रयागराज, उत्तरप्रदेश.
‘दशम ‘अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशन’ आणि सनातन आश्रम यांमध्ये मला हिंदु राष्ट्राची एक प्रतिकृतीच दिसून आली. आमच्या संघटनेचे ‘हिंदु जनजागृती समिती’च्या कार्याला नेहमीच समर्थन राहील.’
१ औ. अधिवक्ता मदनमोहन यादव, वाराणसी, उत्तरप्रदेश.
‘आज आमचेच न्यायालय आमचे म्हणणेही ऐकून घेत नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. अधिवेशन आणि सनातन आश्रम येथे असतांना ‘मी दुसर्या कोणत्या तरी लोकात आहे’, असे मला जाणवले.’
१ अं. अधिवक्ता पिनाकी सुकूल, कोलकाता
‘मी साम्यवादी (कम्युनिस्ट) वातावरणात शिक्षण प्राप्त केले आहे. त्यामुळे आतापर्यंत मी केवळ एक जन्महिंदु होऊन राहिलो. ‘मला अधिवेशनात येण्याची संधी मिळाली’, हे माझे सौभाग्य होते. अधिवेशनाला उपस्थित राहून आल्यानंतर माझ्या मनात पुष्कळ पालट झाला आहे. मी हिंदु राष्ट्राचा सैनिक होण्यापूर्वी प्रथम मला ‘जन्महिंदूपासून कर्महिंदु व्हायचे आहे’, हे शिकायला मिळाले. सनातन आश्रमात मला पुष्कळ आनंद मिळाला.’
२. अधिवेशनात सहभागी होऊ न शकलेल्या हिंदुत्वनिष्ठांचे विचार २ अ. डॉ. कौशिक मलिक, शास्त्र धर्म प्रचार सभा, कोलकाता
‘मी माझ्या आईच्या आजारपणामुळे अधिवेशनाला येऊ शकलो नाही. त्यामुळे मी सनातन आश्रमरूपी वैकुंठाची अनुभूती घेऊ शकलो नाही. ‘मी त्यापासून वंचित राहिलो’, या गोष्टीची मला पुष्कळ खंत वाटत आहे. परात्पर गुरुदेवांनी (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी) ‘हिंदु राष्ट्र येणार आहे’, असे सांगितले आहे, तर ते निश्चितपणे येणारच आहे. ‘मी आणि माझे कार्यकर्ते यांच्याकडून ते कार्य ईश्वराने करवून घ्यावे’, हीच माझी प्रार्थना आहे.’
२ आ. अधिवक्ता श्री. राकेशदत्त मिश्र, पटणा, बिहार.
‘बिहारमध्ये असे अधिवेशन आयोजित करण्यात आले, तर मी संपूर्ण समर्पितभावाने त्यात सहभागी होईन.’
(समाप्त)
– श्री. विश्वनाथ कुलकर्णी (आध्यात्मिक पातळी ६५ टक्के), राज्य समन्वयक, हिंदु जनजागृती समिती, उत्तरप्रदेश आणि बिहार. (२८.०७.२०२२)