पोलिसांकडून १३ धर्मांधांना अटक, तर ६० धर्मांधांवर हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा नोंद !
दौलताबाद येथील धर्मांधांनी ५ हिंदूंना मारहाण केल्याचे प्रकरण
छत्रपती संभाजीनगर – जिल्ह्यातील दौलताबाद येथे बकरी ईदनिमित्त हत्येसाठी गोवंश नेत असल्याची माहिती मिळाल्याने पोलिसांनी धर्मांधांवर कारवाई केली. या रागातून धर्मांधांच्या एका गटाने १७ जून या दिवशी ५ हिंदु तरुणांना अमानुषपणे मारहाण करून त्यांची दुचाकी जाळली. या प्रकरणी पोलिसांनी १३ धर्मांधांना अटक केली असून ५ हिंदु तरुणांमधील गंभीर घायाळ तरुणांच्या जबाबावरून पोलिसांनी ६० धर्मांधांवर हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा नोंदवला आहे.
१. हिंदूंना मारहाण केल्यानंतर हिंदू आणि मुसलमान असे २ गट समोरासमोर आल्याने दौलताबाद गाव अन् पोलीस ठाण्याच्या आवारात तणाव निर्माण झाला होता; म्हणून पोलिसांनी गावातील बाजारपेठ बंद ठेवली होती.
२. १७ आणि १८ जून या दिवशी पोलिसांनी अनेकांची धरपकड केली. त्या वेळी ८ धर्मांधांना अटक केली. आतापर्यंत पोलिसांनी एकूण १३ जणांना कह्यात घेतले आहे. या प्रकरणात १५० जणांवर दंगलीचे गुन्हे नोंदवले आहेत. धर्मांधांच्या आक्रमणात हिंदु तरुण नरेश बळी यांच्या पायाला अस्थीभंग झाला आहे. तुषार म्हस्के आणि भागवत वाघ यांच्या डोक्यात गंभीर जखमा झाल्या आहेत. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार चालू आहेत.
दौलताबाद हे पंचक्रोशीतील मोठे गाव आहे. गावातील बाजारपेठेवर ८ ते १० गावांचा कारभार चालतो. प्रतिदिन अनुमाने १० सहस्र पर्यटक देवगिरी गडावर भेट देतात. त्यामुळे दौलताबाद येथे प्रतिदिन १ कोटी रुपयांहून अधिक उलाढाल होते. बाजारपेठ बंद केल्याने १ कोटी रुपयांची हानी झाली आहे. |
संपादकीय भूमिका
|