६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या श्रीमती शिरीन चाइना (वय ७२ वर्षे) यांना रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमातील ध्यानमंदिरात शिव, हनुमान आणि श्री दुर्गादेवी या देवतांची चित्रे पहातांना जाणवलेली सूत्रे

‘रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमातील ध्यानमंदिरात असलेल्या सनातन-निर्मित चित्रांकडे पाहून काय जाणवते ?’, असा प्रयोग घेण्यात आला. त्या वेळी शिव, हनुमान आणि श्री दुर्गादेवी या चित्रांतील ‘प्रत्येक चित्राकडे ५ मिनिटे पाहून काय जाणवते ?’, असा प्रयोग मी केला. तेव्हा मला जाणवलेली सूत्रे येथे दिली आहेत.

श्रीमती शिरीन चाइना

१. शिवाचे चित्र

अ. चित्रातील शिव ध्यानावस्थेत आहे. त्याच्याकडून माझ्याकडे तेज प्रक्षेपित होत असल्यामुळे मला पुष्कळ प्रमाणात घाम आला आणि ‘माझ्याभोवती असलेली नकारात्मक शक्ती नष्ट झाली’, असे मला जाणवले.

आ. काही वेळ मला ‘शिव डोळ्यांची उघड-झाप करत आहे’, असे जाणवून पुष्कळ आनंद झाला.

इ. शिवाच्या डोक्यावर जेथे चंद्र आहे, तेथील चेहर्‍याच्या बाजूकडील केसांत जिवंतपणा जाणवून केसांवर सोनेरी प्रकाश दिसत होता.

ई. शिवाचे मुखमंडल तेजस्वी दिसत होते; मात्र त्याच्या पायांवर राखाडी रंगाची गडद छटा दिसत होती. मला त्याचे पाय सजीव जाणवत होते.

उ. ‘त्याच्या चित्रातील कमंडलू प्रत्यक्षात तिथे आहे’, असे मला जाणवले.

ऊ. मी शिवाचे चित्र पहात नसून ‘साक्षात् शिवाच्या जवळ उभी आहे’, असे अनुभवत होते.

२. श्री दुर्गादेवीचे चित्र

अ. श्री दुर्गादेवीचे चित्र पहाताक्षणी ‘तिच्याकडून माझ्या दिशेने पुष्कळ मोठ्या प्रमाणात सकारात्मक शक्ती येत आहे’, असे मला जाणवले.

आ. ‘देवीच्या एका हातात असलेले सुदर्शनचक्र प्रत्यक्ष आहे’, असे मला दिसले.

इ. देवीच्या एका हातात गदा आहे. ‘गदेचा गोलाकार भाग अधिक तेजस्वी दिसत असून त्यावर सूक्ष्मातून असंख्य ‘ॐ’ ची चिन्हे आहेत’, असे मला जाणवले.

ई. दुर्गामाता मला सांगत आहे, ‘निर्भय हो. तुझी साधना चांगली होण्यासाठी येणारी सर्व आव्हाने तू शांतपणे स्वीकार’, असे मला जाणवले.

३. हनुमानाचे चित्र

अ. ‘माझ्याभोवती हनुमानाची शेकडो रूपे असून त्यांच्यामुळे माझे रक्षण होत आहे. त्याची माझ्यावर कृपा आहे. त्यामुळे मला सुरक्षित वाटत आहे’, असे मला जाणवले.

‘प.पू. गुरुदेव, माझ्याकडून हा प्रयोग करून घेऊन तुम्ही मला पुष्कळ आनंद दिलात’, त्याबद्दल आपल्या चरणी कृतज्ञता !’

– श्रीमती शिरीन चाइना (वय ७२ वर्षे), फोंडा, गोवा.

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक