हिंदु तरुणीने इस्लाम स्वीकारून केले मुसलमान तरुणाशी लग्न !
|
सुळ्या (कर्नाटक) – येथे ‘लव्ह जिहाद’ची एक घटना उघडकीस आली आहे. क्रमांकाची पाटी नसलेल्या एका चारचाकी वाहनातून एक हिंदु तरुणी आणि २ मुसलमान तरुण जात असल्याची माहिती बजरंग दल अन् हिंदु जागरण वेदिके या संघटनांच्या कार्यकर्त्यांनी पोलिसांना दिल्यावर पोलिसांनी ते वाहन अडवले. पोलिसांनी या ३ जणांना पोलीस ठाण्यात आणून चौकशी केल्यावर ही घटना लव्ह जिहादची असल्याचे उघड झाले. लव्ह जिहादला बळी पडलेल्या तरुणीचे नाव इशा असून ती होसंगडी येथील रहिवासी आहे. या मुलीने धर्मांतर करून मुसलमान तरुणाशी विवाह केला आहे. तिने पुन्हा स्वतःच्या घरी जाण्यास नकार दिला आहे. त्यामुळे पोलिसांना या ३ जणांना सोडून द्यावे लागले. (पाकिस्तानासह भारतातही हिंदु तरुणींच्या संदर्भात अशीच स्थिती असणे हिंदूंना लज्जास्पद ! – संपादक)
संपादकीय भूमिकाया घटनेतून धर्मांध मुसलमानांकडून हिंदु तरुणींचा कोणत्या थराला बुद्धीभेद केला जातो, हे लक्षात येते ! अशा घटना रोखण्यासाठी कोणतेही सरकार प्रयत्न करत नसल्याची ही स्थिती हिंदु राष्ट्र अपरिहार्य करते ! |