Gomata On Bakri-Eid Poster : बकरी ईदच्या शुभेच्छा देणार्‍या भित्तीचित्रावर हिरव्या रंगात गोमातेवर दाखवली मशीद !

तेलंगाणामध्ये काँग्रेसचे आमदार कुंभम् अनिलकुमार रेड्डी यांच्याकडून क्षमायाचना !

डावीकडे हिरव्या रंगात गोमातेवर दाखवली मशीद आणि काँग्रेसचे आमदार कुंभम् अनिलकुमार रेड्डी

भाग्यनगर (तेलंगाणा) – येथे बकरी ईदच्या निमित्ताने शुभेच्छा देण्यासाठी गायीचे चित्र असलेले भित्तीचित्र सामाजिक माध्यमांतून प्रसारित केल्याच्या प्रकरणी काँग्रेसचे आमदार कुंभम् अनिलकुमार रेड्डी यांनी क्षमायाचना केली आहे. या भित्तीचित्रावरून रेड्डी यांच्यावर टीका झाल्यानंतर त्यांनी ही क्षमायाचना केली.

या भित्तीचित्रात हिरव्या रंगात गायीच्या अंगावर मशीद चित्रीत करण्यात आली होती. या चित्राच्या वरच्या भागात तेलंगाणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी, काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रियांका वाड्रा आदींची छायाचित्रे आहेत.

काँग्रेसने पुन्हा हिंदूंच्या भावना दुखावल्या ! – आमदार टी. राजा सिंह

‘गोहत्याबंदी असल्याचे ठाऊक असूनही काँग्रेसने पुन्हा हिंदूंच्या भावना दुखावल्या आहेत’, अशी टीका येथील गोशामहल विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे आमदार टी. राजा सिंह यांनी केली.

संपादकीय भूमिका

  • अशांनी केवळ क्षमायाचना केली; म्हणून त्यांना सोडू नये, तर त्यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवून त्यांना कारागृहात डांबावे.  तसेच अशांवर जलद गती न्यायालयात खटला चालवून कठोर त्यांना शिक्षा करावी !
  •  रेड्डी यांनी मुसलमानांच्या श्रद्धास्थानांचा असा अवमान केला असता, तर एव्हाना त्यांच्या विरोधात ‘सर तन से जुदा’चा (शिरच्छेदाचा) फतवा निघाला असता ! हिंदु सहिष्णु आणि निद्रिस्त असल्याने ते स्वतःच्या धर्मभावनांच्या अवमानाविषयी निष्क्रीयच रहातात !