चीनला ना मोदी घाबरतील, ना आम्ही घाबरू ! – तैवानचे चीनला प्रत्युत्तर
तैपेई (तैवान) – तैवानचे राष्ट्राध्यक्ष लाइ चिंग तेह यांनी भारतातील लोकसभा निवडणुकीत पुन्हा पंतप्रधान झाल्याविषयी नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन केले होते. यावर चीनने आक्षेप घेतला होता. त्यास तैवानचे उपपरराष्ट्रमंत्री तिएन चुंग-क्वांग यांनी ‘चीनला ना मोदी घाबरतील, ना आम्ही घाबरू’, अशा शब्दांत प्रत्युत्तर दिले आहे. भारत आणि तैवान यांच्यातील मजबूत संबंधांच्या सूत्रावर चीन करत असलेल्या टीकेविषयी तैवानच्या उपपरराष्ट्रमंत्र्यांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावर ते म्हणाले की, धमक्या दिल्यामुळे मैत्री तुटत नाही. तैवान भारताससमवेत भागीदारी वाढवण्यावर भर देत आहे. दोन्ही देशांमधील संबंध हे परस्पर लाभ आणि सामायिक मूल्ये यांवर आधारित आहेत.