Denigration Of Lord ShriRam : (म्हणे) ‘श्रीराम आणि पांडव त्यांच्या वडिलांपासून जन्मलेले नाहीत !’ – प्रा. के.एस्. भगवान

कर्नाटकातील प्रा. के.एस्. भगवान यांचे हिंदुद्वेषी विधान !

प्रा. के.एस्. भगवान

हरिहर (कर्नाटक) – रामायणातील श्रीराम आणि महाभारतातील पांडव त्यांच्या वडिलांपासून जन्मलेले नाहीत, या गोष्टीला पुरावे आहेत, असे हिंदुद्वेषी विधान पुरोगामी विचारवंत प्रा. के.एस्. भगवान यांनी नुकतेच येथे केले. कर्नाटक दलित संघर्ष समितीच्या वतीने आयोजित केलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि प्रा. बी. कृष्णप्पा यांच्या जन्मदिनाच्या कार्यक्रमात ते बोलत होते.

प्रा. भगवान पुढे म्हणाले की,

१. राम ‘दशरथ महाराजांचा पुत्र’ एवढाच समजलेला विषय असला, तरी राम दशरथ महाराजांपासून जन्माला आला नसून एका पुरोहितांपासून जन्माला आलेला आहे. त्याचप्रमाणे महाभारतात शापग्रस्त राजा पांडू हा ‘५ पांडवाचा पिता’, असे सांगण्यात येते; परंतु पांडवांचा जन्म झाला तो देवतांमुळे, असे महाभारतात सांगितले आहे.

२. देवस्थाने आणि पुराणे यांचा काहीच उपयोग नाही. पुराणे आणि मनुस्मृति यांमध्ये ब्राह्मणांना सोडून उरलेल्या सर्व जाती-जमातींना शूद्र म्हटले जात असे. सर्व शूद्रांना ‘ब्राह्मणांचे सेवक’ म्हटले जात असे. मनुष्याला मनुष्य न समजणारी अशी पुराणे आणि मनुस्मृति यांमुळे देशातील बहुसंख्यांकांना काहीच किंमत उरली नाही. तरीही काही जण पुराणे आणि मनुस्मृति यांना डोक्यावर घेऊन ‘त्याप्रमाणे कारभार चालवू’, असे म्हणून नाचत असतात. (खोटे बोल; पण रेटून बोल, अशा वृत्तीचे पुरो(अधो)गामी विचारवंत ! या तथाकथित पुरोगाम्यांनी हिंदु धर्मातील धर्मग्रंथांचा कधी अध्यात्माच्या स्तरावर अभ्यासच न केल्याने आणि बुद्धीच्या स्तरावर त्यांचा किस पाडल्याने ते अशा प्रकारचा अपप्रचार करत आहेते. अशांना सांगण्याचा प्रयत्न करणे, म्हणजे पालथ्या घड्यावर पाणीच होत ! – संपादक)

३. कर्नाटक राज्यात झालेल्या जातीय जनगणनेचे विवरण राज्य सरकारने घोषित केले पाहिजे. त्यातून शोषित समुदायवाल्यांना आहार, उद्योग आणि शिक्षण मिळाले पाहिजे. (जाती-पातींमध्ये अडकलेले म्हणजे ‘पुरोगामी’ ! – संपादक)

संपादकीय भूमिका 

  • स्वतःला पुरो(अधो)गामी म्हणणारे केवळ हिंदूंच्या श्रद्धास्थानांविषयीच अशा प्रकारचे विधान करू धजावतात; कारण हिंदु सहिष्णु आहेत. या उलट अन्य धर्मियांच्या संदर्भात कुणी अशी विधाने केली, तर थेट ‘सर तन से जुदा’चा (शिरच्छेदाचा) फतवा काढला जातो !
  • भगवान श्रीरामांचा जन्म देवतेच्या कृपाप्रसादामुळे, तर पांडवांचाही जन्म विविध देवतांच्या कृपेने झालेला आहे, हे सत्य असले, तरी त्यांना राजा दशरथ अन् पांडू यांचेच पुत्र म्हणून ओळखले जाते !