Kenya Crows : केनिया भारतीय वंशाचे १० लाख कावळे मारणार !
नैरोबी – भारतीय वंशाच्या कावळ्यांमुळे केनिया देश हैराण झाला आहे. या देशात आगामी ६ मासांत तब्बल १० लाख कावळे मारण्यात येणार आहेत. केनियात कावळ्यांचा उपद्रव वाढला आहे. कावळ्यांच्या वाढत्या संख्येमुळे शेती, हॉटेल आणि पर्यटन या व्यवसायांवर परिणाम होत असल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. केनियन सरकारच्या या निर्णयावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत.
Kenya vows to kill a million Indian House Crows in next six months
Kenya Wildlife Service (KWS) insists the Crows are invasive alien birds creating nuisance for tourists, farmers for decades & harming local avian populations pic.twitter.com/vjyVj73ODn
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) June 19, 2024
भारतीय वंशाचे हे कावळे वर्ष १९४०च्या सुमारास आफ्रिकेत आल्याचे सांगितले जाते. या कावळ्यांमुळे केनियाच्या अर्थव्यवस्थेवरही परिणाम होत असल्याचे सरकारचे म्हणणे आहे. केनियन सरकारला पर्यटनातून मोठ्या प्रमाणात परकीय चलन मिळते; मात्र केनियात येणार्या पर्यटकांसाठी भारतीय कावळे त्रासदायक ठरत आहेत. केनियातील शेतकर्यांनीसुद्धा भारतीय प्रजातीचे कावळे त्रासदायक ठरत असल्याचे म्हटले आहे.