Mumbai Bomb Threat : मुंबईतील ५० रुग्‍णालये, महानगरपालिका आणि महाविद्यालये बाँबने उडवण्‍याची धमकी !

मुंबई – मुंबईतील ५० रुग्‍णालये, काही महाविद्यालये आणि मुंबई महानगरपालिकाचे कार्यालय बाँबने उडवण्‍याी धमकी देणारा ईमेल प्राप्‍त झाला आहे. जसलोक, रहेजा, सेव्‍हन हिल, कोहिनूर, के.ई.एम्., जेजे, सेंट जॉर्ज यांसह अन्‍यही प्रसिद्ध रुग्‍णालयांना, तसेच महाविद्यालये येथे असे धमकीचे मेल आले आहेत.

१. पोलिसांनी रुग्‍णालये, महाविद्यालये आणि मुंबई महानगरपालिकेचे कार्यालय येथे बाँबपथकाद्वारे शोध घेतला; मात्र कुठेही बाँब किंवा कोणतीही संशयास्‍पद वस्‍तू आढळलेली नाही. रुग्‍णालयांच्‍या खाटांखाली आणि प्रसाधनगृहांमध्‍येे बाँब ठेवण्‍यात आल्‍याचे मेलमध्‍ये लिहिले होते.

२. ईमेल करण्‍यासाठी ‘बीबल डॉट कॉम’ नावाच्‍या संकेतस्‍थळाचा उपयोग करण्‍यात आला आहे. धमकीचे ईमेल पाठवणार्‍याचा पोलीस शोध घेत आहेत. धमकीचे मेल आल्‍यावर काही महाविद्यालयांकडून पोलीस ठाण्‍यात माहिती देण्‍यात आली.

३. वल्लभभाई पटेल मार्ग पोलीस ठाण्‍यातील पोलीस या प्रकरणाचा शोध घेत आहेत. धमकीचा मेल करणार्‍या अज्ञाताच्‍या विरोधात पोलिसांनी गुन्‍हा नोंदवला आहे.

संपादकीय भूमिका

  • मागील काही महिने भारतात विविध ठिकाणी बाँबने रुग्‍णालये किंवा शाळा उडवण्‍याच्‍या धमक्‍या पोलिसांना मिळाल्‍या आहेत. काही समाजकंटकांची टोळी विकृत मनोवृत्तीपायी अशा धमक्‍या देत आहेत का ? त्‍यांना शिक्षा होणे आवश्‍यक !
  • वारंवार अशा धमक्‍या देणारे इमेल पाठवून त्‍या खोट्या असल्‍याचे सुरक्षायंत्रणांच्‍या लक्षात असल्‍यास काही ठरावीक काळानंतर पोलीसही त्‍याकडे दुर्लक्ष करतात. याचा अपलाभ घेत आतंकवादी मोठे षड्‍यंत्र तर रचत नसतील ना ? सुरक्षायंत्रणांनी याच्‍या मुळाशी जाणे आवश्‍यक !