सातारा जिल्हा पोलीस भरती प्रक्रिया आजपासून चालू !
सातारा, १८ जून (वार्ता.) – सातारा जिल्हा पोलीस दलाच्या वतीने २३५ पदांसाठी १९ जूनपासून भरती प्रक्रिया चालू करण्यात येणार आहे. सकाळी ७ वाजल्यापासून सायंकाळी उशिरापर्यंत सलग ८ दिवस ही भरती प्रक्रिया चालू रहाणार आहे. या पदांसाठी सातारा जिल्हा पोलीस दलाला १३ सहस्र ३० अर्ज प्राप्त झाले आहेत, अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली.