कांचीपूरम् (तमिळनाडू) येथील सनातनच्या सेवाकेंद्रात सप्तर्षींच्या आज्ञेने श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांच्या हस्ते करण्यात आले ‘ललितात्रिपूर सुंदरी यंत्रा’चे पूजन !
कांचीपूरम् (तमिळनाडू) – कांचीपूरम् येथील सनातनच्या सेवाकेंद्रात सप्तर्षींनी पू. डॉ. ॐ उलगनाथन् यांच्या माध्यमातून सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या एक आध्यात्मिक उत्तराधिकारी श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांच्या हस्ते १८ जून या दिवशी ‘स्वाती’ नक्षत्र असतांना ‘ललितात्रिपूर सुंदरी यंत्रा’चे विधीवत् पूजन करण्यात आले. ‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवात सूक्ष्मातून येणारे अडथळे दूर व्हावेत आणि त्यासंबंधीची सेवा करणारे हिंदुत्वनिष्ठ अन् कार्यकर्ते यांना हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी उर्जा प्राप्त व्हावी’, या उद्देशाने हे पूजन करण्यात आले.
वैशिष्ट्यपूर्ण क्षणचित्रे
१. श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ या १८ जून या दिवशी सायंकाळी अग्निहोत्र करत होत्या. त्या वेळी श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांनी ‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सव’ आणि हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी कार्यकर्ते अन् हिंदुत्वनिष्ठ यांना करण्यात येणारे मार्गदर्शन या सर्व कार्याला भगवान विष्णूचा आशीर्वाद प्राप्त व्हावा; म्हणून अग्निनारायणाला प्रार्थना केली. ही प्रार्थना होताच पूर्व दिशेकडील आकाशातून निळे किरण बाहेर पडले. त्या वेळी ‘पंचमहाभूतांचा आशीर्वाद मिळाला’, असे श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांना जाणवले. याचसमवेत हे सूत्र श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ साधकाला सांगत असतांना भारद्वाज पक्षी कांचीपूरम् सेवाकेंद्राच्या येथून उडत गेला.
२. श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांनी कांचीपूरम् सेवाकेंद्राच्या बागेतील फुलांचा हार ‘ललितात्रिपूर सुंदरी यंत्रा’साठी स्वतः बनवला.