भारतात मुंबई प्रथम क्रमांकाचे सर्वांत महागडे शहर !
मर्सरच्या ‘२०२४ कॉस्ट ऑफ लिव्हिंग सर्वे’चा निष्कर्ष !
मुंबई – मुंबई शहर भारतातील सर्वांत महागड्या शहरांच्या सूचीत पहिल्या क्रमांकावर आहे, तर जगभरातील महागड्या शहरांमध्ये मुंबईचा १३६ वा क्रमांक लागतो. मर्सरच्या ‘२०२४ कॉस्ट ऑफ लिव्हिंग सर्वे’तून हे उघड झाले. भारतात मुंबईनंतर देहली, चेन्नई, बेंगळुरू आणि पुणे या शहरांचा समावेश आहे.
मुंबईत वैयक्तिक काळजी, वीज, उपयुक्तता, वाहतूक आणि घर भाड्याने घेणे, हे सर्वच महाग आहे. जगातील सर्वांत महागड्या शहरांमध्ये हाँगकाँगचा प्रथम क्रमांक लागतो.