दिवसभरातील घडामोडींवर एक दृष्टीक्षेप : पोहतांना तुटलेली टाईल्स लागून जखम !; मुलींचा विनयभंग करणारे दोघे अटकेत !…
पोहतांना तुटलेली टाईल्स लागून जखम !
डोंबिवली – येथील क्रीडासंकुलातील तरण तलावात पोहतांना तन्मय कांबळे याला तुटलेली टाईल्स लागून हाताला जखम झाली. त्याने याविषयी पालिका कर्मचार्यांना सांगितले; पण त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. (पालिकेचा निष्काळजी कारभार ! – संपादक) तरण तलावाच्या ठिकाणी प्रथमोपचार पेटीही नसल्याने त्याला घरीच जावे लागले.
मुलींचा विनयभंग करणारे दोघे अटकेत !
मुंबई – येथे अनुक्रमे ५ वर्षीय आणि १५ वर्षीय मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा नोंदवून २ आरोपींना अटक केली आहे. मंदिरातील २० वर्षांच्या पुजार्याने ५ वर्षांच्या मुलीशी अश्लील चाळे केले, तर इमारतीतील रहिवाशाने शिकवणीवर्गाहून घरी येणार्या १५ वर्षीय मुलीचा पाठलाग करून तिच्याशी लगट करण्याचा प्रयत्न केला.
संपादकीय भूमिकाअसुरक्षित मुंबई ! |
पालघर जिल्हा परिषदेच्या शाळा धोकादायक स्थितीत !
पालघर – येथील जिल्हा परिषदेच्या शाळांची स्थिती धोकादायक झालेली आहे. तालुका स्तरावर धोकादायक, मोडकळीस आलेल्या आणि किरकोळ नूतनीकरण करावयाचे असलेल्या अशा एकूण १२१ शाळांमधील १९५ वर्गखोल्या आहेत.
संपादकीय भूमिकाऐन पावसाळ्यात दुरुस्ती कशी होणार ? |
नाशिक-पुणे महामार्गावर उड्डाणपुलाच्या छताला तडे !
नाशिक – नाशिक-पुणे महामार्गावर गेल्या तीन वर्षांपूर्वी उभारण्यात आलेल्या येथील उड्डाणपुलाच्या छताला तडे गेले आहेत. त्यामुळे तेथून पाण्याची गळती होत आहे.
संपादकीय भूमिकाअशा स्थितीतच एखादी दुर्घटना घडल्यास त्याला उत्तरदायी कोण ? |