आतंकवादाचे नवे स्वरूप : रेल्वे जिहाद !
२४ जून २०२४ या दिवशीपासून श्री रामनाथ देवस्थान, गोवा येथे चालू होत असलेल्या ‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवा’च्या निमित्ताने…
१. कोरोमंडल एक्सप्रेसचा अपघात नव्हे तर घातपात !
‘वर्ष २०२३ मध्ये ओडिशातील बालासोर येथे एक मोठा रेल्वे अपघात झाला होता. तेच बालासोर जेथे कधीकाळी क्रांतीकारक बाबा जतिनने इंग्रजांच्या विरोधात युद्ध केले होते. कोरोमंडल एक्सप्रेसच्या या अपघातात अनुमाने ३०० लोक ठार झाले आणि सहस्रो लोक घायाळ झाले होते. हा अपघात होता कि घातपात ? असा प्रश्न मला त्या वेळी पडला. हा अपघात असल्याचे मी आरंभीच्या दिवसापासूनच नाकारले. मी संरक्षण विषयाचा एक विश्लेषक आहे. माझ्या मते ही दुर्घटना नव्हती, तर एक जिहादचे प्रकरण होते. बालासोर हे ठिकाण रणनीतीच्या दृष्टीने अत्यंत संवेदनशील आहे. तेथे भारतीय क्षेपणास्त्रांच्या चाचण्या होतात. कोणत्याही वेळी तेथे विविध देशाचे शत्रू आणि त्यांचे हस्तक फिरत असतात. तेथे रोहिंग्यांनीही वस्ती केली आहे, तसेच तो संरक्षणदृष्ट्या महत्त्वाचाही भाग आहे. त्यामुळे या जिहाद्यांनी या कृत्यासाठी बालासोर निवडले, असे लक्षात येते.
३१.३.२०२३ या दिवशी एका २४ वर्षाच्या युवकाने देहलीवरून ‘जनसंपर्क एक्सप्रेस’ रेल्वे पकडली. त्या गाडीने तो केरळमधील शोरानूर येथे पोचला. तेथे जाऊन त्याने पेट्रोल खरेदी केले आणि अल्लापूरच्या कन्नूर एक्सप्रेसमध्ये चढला. ती गाडी एक पूल पार करत होती. तेव्हा त्याने काही कारण नसतांना सहप्रवाशांवर पेट्रोल फेकून त्यांना आग लावली. यात ९ सहप्रवासी गंभीररित्या घायाळ झाले. त्या वेळी पती-पत्नी आणि त्यांचा मुलगा यांनी धावत्या रेल्वेतून उडी मारली. त्यात त्यांचा मृत्यू झाला. ही घटना ३१.३.२०२३ या दिवशी घडली. हे कृत्य करणारा शाहरुख सैफ कुख्यात शाहीनबागचा (देहली) रहाणारा होता. तो हिंदुद्वेष्टा डॉ. झाकीर नाईकचा फार मोठा अनुयायी होता, असे म्हटले जाते.
२. जिहादचे नियोजित इस्लामिक रूप ‘गजवा-ए-हिंद’ (काफीरांना ठार करण्यासाठीचे युद्ध) !
अ. या हृदयद्रावक घटनेनंतर दोन मासांनी पुन्हा त्याच रेल्वेत प्रसन्नोजीत सिद्दगर याने आग लावली. तेथे नाव पालटणे ही फार सर्वसामान्य गोष्ट आहे. ही घटना १ जून २०२३ या दिवशी घडली. अल्लापूरची कन्नूर एक्सप्रेस कन्नूर रेल्वेस्थानकाच्या यार्डमध्ये लागली असतांना सिद्दगर याने स्वतःच्या अंगाला आग लावली. सुदैवाने रेल्वेचा तो डबा रिकामा होता. त्या रिकाम्या डब्याची स्थिती अतिशय भयावह झाली होती. विशेष म्हणजे तो डबा भारत पेट्रोलियमच्या मोठ्या साठ्याच्या अगदी जवळ होता. या प्रसन्नोजीत सिद्दगरवर कुणाचा प्रभाव होता, हे समजत नाही. एक माणूस केवळ हिंदूंना आगीत जाळण्यासाठी शाहीनबागवरून केरळपर्यंत जातो, हेही कळत नाही. यालाच म्हणतात, ‘गजवा-ए-हिंद’. हेच आहे जिहादचे नियोजित इस्लामिक रूप.
आ. केरळच्या कन्नूरमध्ये जिहादची ‘इकोसिस्टिम’ (विरोधकांची प्रणाली) : शाहीनबागमध्ये काय झाले, ते सर्व जगाने पाहिले आहे. यासाठी ‘पॉॅप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’ केरळवरून शाहीनबागला आली होती. शाहीनबाग येथील आंदोलनासाठी याच संघटनेने आर्थिक साहाय्य केले होते. सर्व व्यवस्थाही त्यांचीच होती. शाहरुख सैफ हा शाहीनबागहून केरळच्या कन्नूर येथे गेला होता. त्यांनी हे कन्नूरच का निवडले ?; कारण तेथे जिहादची संपूर्ण ‘इकोसिस्टिम’आहे आणि हे अनेक वर्षांपासून चालू आहे. या घटनेची पोलीस चौकशी झाली. पोलिसांच्या मतानुसार शाहरुख सैफ याला स्थानिकांकडून साहाय्य मिळाले होते. त्याला रत्नागिरीमध्ये पकडण्यात आले. पोलिसांच्या मते दुसरी घटना घडवणारा प्रसन्नोजीत सिद्दगर हा बंगालमधील २४ परगणा येथे रहाणारा होता. त्याने प्रथम मुंबई आणि कोलकाता येथील उपाहारगृहांमध्ये काम केले. मागील दोन वर्षे तो भिकारी होता. त्याला भीक मिळाली नाही; म्हणून त्याने रागाने आग लावून टाकली. पण हा प्रसन्नोजीत बंगालहून कन्नूरमध्ये का गेला होता ? पूर्व बिहार, बंगाल, बांगलादेश आणि आसाम हे एकमेकांच्या जिहादी ‘इकोसिस्टम’चे भाग आहेत. आता काही दिवसांपूर्वी त्यात ‘सिलीगुडी कॉरिडोर’चाही समावेश झाला आहे.
इ. ममता बॅनर्जींकडून बांगलादेशी आतंकवाद्यांना आश्रय : कर्णावतीमध्ये (अहमदाबादमध्ये) ४ जिहादी आतंकवादी पकडले गेले. ते सर्वजण बंगालचे रहाणारे होते. त्यांना कर्णावतीमध्ये जाऊन जिहादी कारवाया करण्याचे दायित्व सोपवण्यात आले होते. ‘जमात-उल-मुजाहिद्दीन बांगलादेश’ या संघटनेला बांगलादेशात एकाच वेळी ४ ठिकाणी बाँबस्फोट करायचे होते. त्यावर बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसिना यांनी मोठी कारवाई केली. त्यामुळे ते सर्वच्या सर्व भारतात आले. ममता यांनी त्यांच्यासाठी एक कारखाना उघडून दिला. त्यांचे अशा प्रकारे स्वागत झाले की, ते बांगलादेशातून थेट बेंगळुरूपर्यंत जाऊन पोचले.
ई. आतंकवादी कारवायांसाठी विविध ठिकाणी दरोडे : ४ जानेवारी २०२३ या दिवशी ‘जमात-उल-मुजाहिद्दीन बांगलादेश’च्या ४ आतंकवाद्यांना ७ वर्षांची सक्त मजूरीची शिक्षा सुनावण्यात आली. त्यांच्याकडे बाँब आणि रॉकेट लाँचर बनवण्याचे साहित्य सापडले. त्यांनी ठिकठिकाणी दरोडे टाकले होते. त्यांनी सांगितले, ‘आम्हाला जिहाद करण्यासाठी सांगण्यात आले आहे. तुम्हाला कोणतेही आर्थिक साहाय्य मिळणार नाही. तुमचे पैसे तुम्ही स्वतःच मिळवा.’ (याला इस्लामिक भाषेत ‘माल-ए-गनीमत’ असे म्हणतात.) बांगलादेशचा मनुष्य बेंगळुरूमध्ये येऊन दरोडा घालतो. यावरून हा जिहाद कशा प्रकारे केरळपासून देहली, देहलीपासून पाटलीपुत्र आणि बंगालपासून बेंगळुरूपर्यंत पोचला, हे लक्षात घ्या. यालाच ‘गजवा-ए-हिंद’, असे म्हणतात.
३. ‘वन्दे भारत’ एक्सप्रेसवर सातत्याने दगडफेक
मी एवढे सांगू शकतो की, ममता बॅनर्जी यांनी जिहादीकरणाच्या संदर्भात बांगलादेशाला पुष्कळ मागे टाकले आहे. कोरोमंडल एक्सप्रेसच्या दुर्घटनेमागील पार्श्वभूमी आपण सर्व जण जाणतोच. जेव्हा भारतात ‘वन्दे भारत’ रेल्वेगाडी आरंभ झाली, तेव्हापासून तिच्यावर सातत्याने आक्रमणे होत आहेत. या गाडीवर वर्ष २०२३ च्या जानेवारीमध्ये बंगालचे फानसीदेवाग, विशाखापट्टणम् आणि बेंगळुरू ग्रँट येथे दगडफेक झाली. त्यानंतर अशाच प्रकारची दगडफेक फेब्रुवारीमध्ये तेलंगाणातील मेहबूबनगरमध्ये झाली. मार्चमध्ये विजयनगर आणि विशाखापट्टणम् यांच्या मधल्या भागात दगडफेक झाली. त्यानंतर थिरूवनंतपूरम् ते कोझिकोड यांच्या मधील भागात पुन्हा याच गाडीवर आक्रमण करण्यात आले. या सर्व ठिकाणी आक्रमण करण्याची पद्धत एकसारखीच होती. या घटनांतून त्यांना ‘वन्दे भारत’विषयी प्रचंड द्वेष असल्याचे दिसून येते.
‘वन्दे भारत’वर जी सातत्याने दगडफेक करण्यात येते, त्याला इस्लामच्या भाषेत ‘संघ बाजी’ म्हणतात. त्यांच्यात एवढा द्वेष असेल, तर कोरोमंडल एक्सप्रेसशी जिहादी कारवाया आपल्याला कशा थांबवता येतील ? यासंदर्भात मी सर्वप्रथम आवाज उठावला आणि लेख लिहिले होते. कोरोमंडलच्या दुर्घटनेनंतर रेल्वे विभागातील कनिष्ठ अभियंता आमीर खान हा बेपत्ता झाला होता हे विशेष !
४. सर्व जिहादी एकमेकांशी संबंधित
या सर्व महाद्वीपांमध्ये सर्व जिहादी एकमेकांशी जोडलेले आहेत. ‘अल् कायदा’ आणि ‘जमात-ए-इस्लामी’ या संघटना या सर्वांची जननी आहे. पठाणकोट वायूतळावर ‘जैश-ए-महंमद’ने आक्रमण केले होते. त्यात ‘जमात-उल्-मुजाहिद्दीन बांगलादेश’चा मोठा सहभाग होता. जैश-ए-महंमदचा बिलाल हैदर बंगालमध्ये या संघटनेचे जाळे विणण्यात गुंतला होता. हे सर्वजण एकमेकांशी संबंधित आहेत. त्यांना कोणतीही भौगोलिक सीमा नसते. जे कुराण भारतातील लोक वाचतात, तेच कुराण बांगलादेश आणि पाकिस्तान येथेही वाचले जाते.
५. चीनच्या मुसलमानांवरील दडपशाहीवर सर्व इस्लामी जग शांत
माओवादी आणि जिहादी यांचा गट एकत्र आल्याचे आपल्याला शाहीनबागेमध्ये दिसलेच आहे. आपण ‘वन्दे भारत’पासून कोरोमंडल एक्सप्रेसपर्यंत जिहादचे खरे रूप पाहिले. हा आजार आपण प्रतिदिन सहन करत आहोत. १४ व्या शतकापासून हा उद्योग चालू आहे. चीनच्या युनान प्रांतात मशिदी तोडण्यात आल्या. यावर ‘मुस्लीम सहकारी संघटने’चे (‘ओआयसी’चे) सर्व देश गप्प बसले. सौदी अरेबिया, तुर्कीये आणि पाकिस्तानही काही बोलत नाहीत. एवढेच काय, आपल्याकडील मुसलमानही काहीच बोलायला सिद्ध नाहीत. मी दूरचित्रवाहिनीच्या चर्चासत्रांमध्ये जात असतो. तेथे मी त्यांना विचारले, ‘अरे, भाऊ किमान निषेध, तरी नोंदवा.’ चीनच्या झिंजियांग प्रांतात उघूर मुसलमान आहेत. तेथे त्यांनी त्यांच्या मुलाचे ‘महंमद’ असे नाव ठेवायचे बंद केले आहे. ते दाढी वाढवू शकत नाहीत. चीनमध्ये एवढा अन्याय चालू असतांना भारतातील मुसलमान अगदी शांत बसले आहेत. याचा निष्कर्ष हाच आहे की, कधी ना कधी तरी चीन ‘गजवा-ए-हिंद’चा भाग होईल, असे त्यांना वाटते. भारतातील धर्मनिरपेक्षतावादी मुसलमान या ‘गजवा-ए-हिंद’ची कधीच निर्भत्सना करत नाहीत. ‘गजवा-ए-हिंद’ हा केवळ भारतीय प्रदेश आहे. ‘गजवा-ए-ब्रिटन’ नाही, ‘गजवा-ए-फ्रान्स’ नाही, ‘गजवा-ए-जर्मन’ नाही; पण ‘गजवा-ए-हिंद’ आहे. त्यामुळे ‘गजवा-ए-इस्लाम’ हा भारतापासून आरंभ होणार आहे.
६. प्रगतीपथावरील भारतात रहात असल्याविषयी मुसलमानांना कृतज्ञता वाटायला हवी !
डॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम यांनी भारताची प्रतिमा पुष्कळ उंचावली होती. त्यामुळे मुसलमान त्यांना ‘गैरइस्लाम’ समजतात. कलाम यांनी दुसर्यांदा राष्ट्रपती व्हावे, अशी कोणत्याही मुसलमानाची इच्छा नव्हती; कारण ते वीणा वाजवायचे आणि गीता वाचन करायचे. त्यामुळे मुसलमान त्यांचा द्वेष करायचे. आज भारत जगातील चौथी मोठी अर्थव्यवस्था आहे. याविषयी कृतज्ञ राहिले पाहिजे. भारताची फाळणी झाली होती, तेव्हा आपल्याला एक खंडित काशी मिळाली आणि त्यांना एक नवीन काबा मिळाला होता. बघा, आज काशी कुठे आणि काबा कुठे आहे !’
– कर्नल आर्.एस्.एन्. सिंह (निवृत्त), संरक्षणतज्ञ, देहली.
कर्नल आर्.एस्.एन्. सिंह यांचा परिचयकर्नल आर्.एस्.एन्. सिंह हे ‘राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी’चे (‘नॅशनल डिफेन्स अकॅडमी’चे) माजी विद्यार्थी आहेत. ते एक माजी सैन्य अधिकारी असून त्यांनी ‘रॉ ’(रिसर्च अँड ॲनालिसेस) मध्ये काम केले आहे. त्यांच्या कार्यकाळात त्यांनी सैन्य आणि रणनीती यांचेही विश्लेषण केले आहे. ते ६ वर्षांहून अधिक काळ ‘इंडियन डिफेन्स रिव्ह्यू’चे सहयोगी संचालक होते. त्यांनी विविध दूरचित्रवाणी वाहिन्यांवरील चर्चासत्रांमध्ये रणनीती, भू-राजनीती, अंतर्गत सुरक्षा अशी महत्त्वपूर्ण सूत्रे मांडली आहेत. त्यांनी ‘एशिया रणनीती और सैन्य परिपेक्ष’, ‘पाकिस्तानात मिलिटरी फॅक्टर’, ‘द अन्मेकिंग ऑफ नेपाळ’, ‘द जिहादी प्लस’, ‘नो द अँटीनॅशनल्स’ इत्यादी पुस्तकांची रचना केली आहे. |