Ranchi Cow Slaughtered On Eid : रांची (झारखंड) येथे बकरी ईदच्या दिवशी मुसलमानांकडून उघडपणे गोहत्या
व्हिडिओ प्रसारित झाल्यावर पोलिसांनी घेतली नोंद !
रांची (झारखंड) – येथील रमजान कॉलनी भागातील मोकळ्या मैदानात बकरी ईदच्या दिवशी गोहत्या करण्यात आली. याचा व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून प्रसारित झाल्यावर पोलिसांनी गुन्हा नोंदवला. या प्रकरणी पोलीस महंमद अमानुल्ला आणि हकीम खान यांचा शोध घेत आहेत. झारखंडमध्ये गोहत्याबंदी कायदा अस्तित्वात आहे.
प्रसारित झालेल्या व्हिडिओमध्ये काही लोक गायीला भूमीवर पाडतांना दिसत आहेत. शेजारी महिला आणि लहान मुले यांसह अनेक लोक तेथे उभे असल्याचे दिसत आहे.
रांची शहराचे पोलीस उपअधीक्षक के.व्ही. रमण यांनी सांगितले की, माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोचले. येथून मांस जप्त करण्यात आले असून ते तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहे.
झारखंड मुक्ती मोर्चा आणि काँग्रेस यांच्या युती सरकारकडून मुसलमानांचे होणारे लांगूलचालन अत्यंत धोकादायक ! – भाजप
याविषयी प्रतिक्रिया व्यक्त करतांना भाजपचे झारखंड प्रदेशाध्यक्ष बाबुलाल मरांडी म्हणाले, ‘‘पाकूरनंतर राजधानी रांचीच्या मध्यभागी असलेल्या पीस रोड परिसरात दिवसाढवळ्या गोहत्या करण्यात आली. झारखंड मुक्ती मोर्चा आणि काँग्रेस यांच्या युती सरकारकडून मुसलमानांचे होणारे लांगूलचालन अत्यंत धोकादायक आहे. घुसखोरांना राजकीय पाठबळ देऊन बंगालसारखी भयंकर परिस्थिती निर्माण करण्याचा हा प्रयत्न आहे.’’
संपादकीय भूमिकाझारखंडमध्ये गोहत्याबंदी कायदा असतांनाही उघडपणे गोहत्या केली जाते, हे झारखंड मुक्ती मोर्चा सरकार आणि त्याचे पोलीस यांना लज्जास्पद ! |