नमाजपठण चालू असतांना शिवमंदिरातील कार्यक्रमाचा भोंग्यावरून आवाज ऐकू आल्यावर मुसलमानांनी केला विरोध !
दरभंगा (बिहार) येथे बकरी ईदच्या दिवशीची घटना !
दरभंगा (बिहार) – दरभंगा जिल्ह्यातील जमालपूर येथील एका गावात बकरी ईदच्या दिवशी नमाजपठण चालू असतांना येथील शिवमंदिरात ‘शिव चर्चा’ या कार्यक्रमाच्या वेळी ध्वनीक्षेपक लावण्यात आला होता. त्याला मुसलमानांनी विरोध केल्यावर येथे हिंदू आणि मुसलमान यांच्यामध्ये वाद होऊन मुसलमानांनी ध्वनीक्षेपक काढण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे येथे तणाव निर्माण झाला. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत वाद मिटवला. तणावपूर्ण परिस्थिती पहाता गावात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
स्थानिक ग्रामस्थ सुशील कुमार यांनी आरोप केला की, ‘अनुमाने ५० मुसलमानांनी मंदिरावर लावण्यात आलेला ध्वनीक्षेपक काढण्याचा प्रयत्न केल्यावर हिंदूंनी त्याला विरोध केला. या वेळी दोन्ही बाजूंनी एकमेकांवर वस्तू फेकणे चालू होते.’ या घटनेचा व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून प्रसारित झाला आहे.
संपादकीय भूमिका
|