Bakri Eid Odisha Muslims Attacked Hindus : बालेश्वर (ओडिशा) येथे धर्मांध मुसलमानांकडून हिंदूंवर पोलिसांसमोर आक्रमण !
|
बालेश्वर (ओडिशा) – येथील सुनाहाट भागात पशूंची हत्या केल्यामुळे बकरी ईदच्या दिवशी एका नाल्याचे पाणी लाल झाल्यावरून हिंदु संघटनेने आंदोलन केले. त्यामुळे मुसलमानांनी हिंदूंवर पोलिसांसमोरच आक्रमण केले. यामुळे येथे तणाव निर्माण झाला. या वेळी मोठ्या प्रमाणात दगडफेक करण्यात आल्याने पोलीस आणि पत्रकार घायाळ झाले. येथे जमावबंदी लागू करण्यात आली असून मोठ्या प्रमाणात पोलीस तैनात करण्यात आले आहेत.
Now when the BJP is governing Odisha, Hindus hope that this kind of incident will not happen again in the state and those who do such riots will be punished severely.#Balasore https://t.co/GAw1pCDQCG
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) June 19, 2024
१७ जूनला बकरी ईदच्या दिवशी दुपारी काही स्थानिकांना लोकवस्तीजवळून वाहणार्या नाल्यात लाल रंगाचे पाणी दिसले. ही गोष्ट तात्काळ पोलिसांना कळवण्यात आली. पोलिसांनी लाल रंगाच्या पाण्याचे नमुने घेऊन ते प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवले. हे लाल पाणी मुसलमानांनी केलेल्या हत्या केलेल्या पशूंचे असल्याचे सांगत हिंदु संघटनेच्या कार्यकर्त्यांनी मुख्य रस्त्यावर आंदोलन करण्यास प्रारंभ केला. त्यानंतर येथे मुसलमानही पोचले. त्यांनी हिंदु कार्यकर्त्यांशी वाद घातला. पोलीस उपस्थित असतांना मुसलमानांनी हिंदूंवर दगडफेक चालू केली.
(पोलीस उपस्थित असतांना मुसलमान दगडफेक करू शकतात, याचाच अर्थ त्यांच्यावर पोलिसांचा वचक नाही. अशा स्थितीत हिंदू कधीतरी सुरक्षित राहू शकतील का ?, याचा हिंदूंनी विचार केला पाहिजे ! – संपादक) यात काही जण घायाळ झाले, तसेच काही वाहने आणि वृत्तवाहिन्यांचे कॅमेरे यांची हानी झाली. पोलिसांनी कसेबसे मुसलमानांना हुसकावून लावत परिस्थितीवर नियंत्रण मिळवले. या प्रकरणी अद्याप कुणालाही अटक करण्यात आली नसल्याचे सांगितले जात आहे.
संपादकीय भूमिकाओडिशामध्ये आता भाजपचे सरकार आले आहे. राज्यात पुन्हा अशा प्रकारची घटना घडणार नाही आणि अशी दंगल करणार्यांना कठोर शिक्षा केली जाईल, अशी हिंदूंना अपेक्षा आहे ! |