हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावणार्या ‘महाराज’ या चित्रपटाच्या प्रसारणावर देशभरात बंदी आणावी !
हिंदु जनजागृती समितीची पुणे जिल्हाधिकार्यांना निवेदनाद्वारे मागणी !
पुणे, १७ जून (वार्ता.) – अभिनेता आमीर खान यांचा मुलगा जुनैद खान निर्मित ‘महाराज’ या चित्रपटात जाणीवपूर्वक हिंदु संतांना दुराचारी, गुंड, वासनांध दाखवले आहे. त्यामुळे या चित्रपटाच्या प्रसारणावर देशभरात बंदी आणण्याविषयी १२ जून या दिवशी छत्रपती शिवाजी महाराज स्मारक, कोथरूड, पुणे येथे हिंदु राष्ट्र-जागृती आंदोलन घेण्यात आले. त्या आंदोलनातील मागण्यांचे निवेदन माननीय उपनिवासी जिल्हाधिकारी श्रीमती ज्योती कदम यांना देण्यात आले. याप्रसंगी सर्वश्री सचिन घुले, अनिल दोनवडे आणि शुभम लोवे हे धर्मप्रेमी होते, तसेच हिंदु जनजागृती समितीचे श्री. पराग गोखले आणि श्री. कृष्णाजी पाटील हेही उपस्थित होते.
१. श्री. सचिन घुले यांनी निवेदनातील मागणीच्या वस्तूस्थितीविषयी सविस्तर तपशील उपनिवासी जिल्हाधिकार्यांना सांगितला.
२. मद्यालये, बार यांना असलेली देवता, राष्ट्रपुरुष, गड-दुर्ग यांची नावे पालटण्याविषयी महाराष्ट्र शासनाने आदेश काढला आहे. तरीही या संवेदनशील विषयावर मुंबई जिल्हा उत्पादन शुल्क विभागाकडून कार्यवाही केली नाही, या विषयीचे निवेदन उपनिवासी जिल्हाधिकार्यांना देण्यात आले. या विषयाचे गांभीर्य समितीचे श्री. कृष्णाजी पाटील यांनी अवगत केले.
३. ‘मंदिर अथवा चर्च यांमध्ये जाण्यापेक्षा सहस्रोंना मारणार्या शस्त्र बनवणार्या कारखान्यात जाणे चांगले’, असे धार्मिक भावना दुखावणारे विधान करणार्या झाकीर नाईक याच्यावर कठोर कारवाई करण्याविषयीचे निवेदन उपनिवासी जिल्हाधिकार्यांना देण्यात आले. याविषयीचा सविस्तर तपशील समितीचे श्री. पराग गोखले यांनी सांगितला.
‘निवेदनातील आपल्या सर्व मागण्या पोचवण्याचा प्रयत्न मी नक्कीच करीन’, असे ज्योती कदम सांगितले.