आनंदी आनंदच सर्वत्र व्यापला ।
‘एकदा माझ्या मनात मनुष्याच्या जीवनात येत असलेल्या दुःखासंबंधी आलेले विचार येथे दिले आहेत.
दुःख मला म्हणाले ।
मी येऊ का तुम्हाला भेटायला ।। १ ।।
मी म्हटले दुःखाला ।
ये बाबा, आनंदाने भेटायला ।। २ ।।
बिचार्या अज्ञानी दुःखाला नव्हते ठाऊक ।
तो केवळ भेटू शकतो सुख संवेदनांना ।। ३ ।।
सत्-चित्-आनंद स्वरूपाला भेटणे कदापि शक्य नाही ।
हे कळत नव्हते दुःखाला ।। ४ ।।
सुखाची आस सोडून, दुःख दुःखरहित होऊन ।
आनंदस्वरूप होऊन आले मज भेटण्याला ।। ५ ।।
पण तेथे कोण उरले दुसरे भेटण्याला ।
आनंदी आनंदच सर्वत्र व्यापला’ ।। ६ ।।
– (सद्गुरु) डॉ. चारुदत्त पिंगळे, राष्ट्रीय मार्गदर्शक, हिंदु जनजागृती समिती (६.११.२०२३)