निष्ठेने नाम घेणे महत्त्वाचे !
सुंठ हे असे औषध आहे की, ते शरिरात न्यून झालेल्या द्रव्याची भरपाई करते आणि अधिक झालेले द्रव्य न्यून करून आरोग्य राखते. नाम हे सुंठीसारखे आहे. पारमार्थिक प्रगतीच्या मार्गात प्रत्येक व्यक्तीतील ज्या ज्या गुणदोषांमुळे अडथळा येतो, ते गुणदोष दूर करून भगवंताचे नाम प्रगतीचा मार्ग मोकळा करते. म्हणून कुणात कोणतेही गुणदोष असोत, त्याने निष्ठेने नाम घेतले की, त्याचे काम बिनचूक होऊन तो ध्येय गाठतो. ज्याच्याजवळ भगवंत आहे, त्यालाच आनंदाचे जगणे प्राप्त होईल; म्हणून ज्याला जगायचे आहे, त्याने नाम घ्यावे.
– ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज
(‘पू. (प्रा.) के.व्ही. बेलसरे आध्यात्मिक साहित्य’ यांच्या फेसबुकवरून साभार)