सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या प्रती भाव असलेल्या ६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या गोवा येथील (कै.) सौ. वैशाली वसंत परब (वय ५८ वर्षे)
१३.१.२०२४ या दिवशी मये, गोवा येथील सौ. वैशाली वसंत परब यांचे निधन झाले. त्यांची मुलगी (सौ. प्राची प्रवीण गावस) आणि जावई (श्री. प्रवीण महादेव गावस) यांना जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.
१. सौ. प्राची प्रवीण गावस, मये, गोवा. (कै. (सौ.) वैशाली वसंत परब यांची मुलगी)
१ अ. सहनशीलता : ‘आरंभी आईला उच्च रक्तदाब आणि नंतर आमवात यांचा त्रास होत होता. तिने पुष्कळ त्रास सहन केला. शरिराला त्रास होत असला, तरी ती मनाने उत्साही असायची. तिने औषधे घ्यायचा कधीच कंटाळा केला नाही. ती नेहमी प्रार्थना करून आणि कृतज्ञताभावात राहून औषध घ्यायची. सर्व त्रास सहन करून ती आवडीने स्वयंपाक करायची.
१ आ. सेवाभाव
१ आ १. आश्रमातील साधकांसाठी मनापासून आणि निष्ठेने खाऊ बनवणे : आई सनातनच्या आश्रमातील साधकांसाठी खाऊ बनवण्याची सेवा आवडीने, प्रामाणिकपणे, चिकाटीने, तळमळीने आणि निष्ठेने करत असे. ‘हा खाऊ गुरुमाऊलींना अपेक्षित आहे, तसा तेच बनवून घेणार आहेत आणि तो बनवण्यासाठी तेच मला शक्ती देणार आहेत’, असे ती सतत म्हणायची. आरंभी ती ऊन-पावसाची पर्वा न करता स्वतः खाऊ करून घेऊन बसने फोंडा, गोवा येथील सुखसागर येथे नेऊन द्यायची.’
१ आ २. शारीरिक त्रास असतांनाही जमेल, तशी सेवा करणे : आईला वाताचा त्रास असल्यामुळे ती बाहेर जाऊन सेवा करू शकत नव्हती. त्यामुळे ती भ्रमणभाषवरून संपर्क करून सेवा करू लागली. ती सनातन-निर्मित सात्त्विक साहित्य, पंचांग आणि राखी यांची मागणी घेत असे अन् साप्ताहिक ‘सनातन प्रभात’चे वर्गणीदारही करत असे. ती अर्पण मिळवण्यासाठीही प्रयत्न करत असे.
१ इ. भाव : सेवा करतांना तिचा सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याप्रती भाव सतत जागृत होत असे.’
२. श्री. प्रवीण महादेव गावस, मये, गोवा. (कै. (सौ.) वैशाली परब यांचे जावई)
२ अ. ‘गाडीत बसल्यावर सासूबाई प्रार्थना, जयघोष आणि नामजप करायच्या अन् इतरांना त्याची आठवण करून द्यायच्या.
२ आ. रुग्णाईत असतांनाही सेवा करणे
१. ‘माझ्या सासूबाई रुग्णाईत असतांनाही सनातनचे सात्त्विक साहित्य आणि पंचांग यांची भ्रमणभाषवरून मागणी घेत अन् बाबांना (माझ्या सासर्यांना) ते साहित्य पोचवायला सांगत असत.
२. त्या इतरांना ‘श्री गुरुदेव दत्त ।’, हा नामजप करायला सांगत असत.
२ इ. भाव : प.पू. गुरुदेवांप्रती त्यांचा पुष्कळ भाव होता.’
(सर्व सूत्रांचा दिनांक ९.२.२०२४)