५१ टक्के आध्यात्मिक पातळीचा बदलापूर, जिल्हा ठाणे येथील कु. श्लोक परचुलकर (वय ८ वर्षे) !
उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी (सात्त्विक) बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र (सनातन धर्म राज्य) चालवणारी पिढी ! कु. श्लोक परचुलकर हा या पिढीतील एक आहे !
(‘वर्ष २०२४ मध्ये कु. श्लोक राकेश परचुलकर याची आध्यात्मिक पातळी ५१ टक्के आहे.’ – संकलक)
ज्येष्ठ शुक्ल एकादशी (१८.६.२०२४) या दिवशी बदलापूर, जिल्हा ठाणे येथील कु. श्लोक राकेश परचुलकर याचा ८ वा वाढदिवस आहे. त्यानिमित्त त्याच्या आईच्या लक्षात आलेली त्याची गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.
कु. श्लोक राकेश परचुलकर याला ८ व्या वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने अनेक शुभाशीर्वाद !
‘सनातन मध्ये आलेल्या दैवी बालकांमुळे’ मी साधकांना तयार केले’, असा अहंभाव माझ्यात निर्माण झाला नाही.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
पालकांनो, हे लक्षात घ्या !‘तुमच्या मुलात अशा तर्हेची वैशिष्ट्ये असली, तर ‘ते उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेले आहे’, हे लक्षात घेऊन तो मायेत अडकणार नाही, उलट त्याच्यावर साधनेला पोषक होतील, असे संस्कार करा. त्यामुळे त्याच्या जन्माचे कल्याण होईल आणि तुमचीही साधना होईल.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले |
१. इतरांना साहाय्य करणे
‘कु. श्लोकला घरातील काही काम सांगितल्यास तो ती कामे करतो. आम्ही सकाळी लवकर कुठे बाहेर गेलो, तर तो चादरींच्या घड्या घालून ठेवतो.
२. त्याला सनातनच्या वह्या वापरायला आवडतात.
३. धर्माभिमानी
अ. तो नियमित टिळा लावून शाळेत जातो.
आ. त्याला छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावरील चित्रपट पहायला आवडते. त्याला खेळतांना मावळा व्हायला आवडते.
इ. २२.१.२०२४ या दिवशी श्रीरामलल्लाच्या मूर्तीच्या (श्रीरामाच्या बालक रूपातील मूर्तीच्या) प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या निमित्ताने आमच्या वसाहतीत सर्वांनी एकत्रित एक कार्यक्रम केला. श्लोकला तो कार्यक्रम पुष्कळ आवडला. त्या वेळी श्लोक नामजप करत होता आणि अधून मधून रामाचा जयजयकार करत होता.
ई. एकदा त्याच्या शाळेत ऐतिहासिक प्रदर्शन होते. तेव्हा त्याच्या वर्गातील मुलांना श्रीरामाच्या जीवनावर आधारित प्रसंग सांगण्यास सांगितले होते. तेव्हा श्लोकला भरताने श्रीरामाच्या पादुकांचे पूजन केल्याच्या प्रसंगाविषयी सांगायचे होते. त्या वेळी त्याने चांगल्या प्रकारे त्याविषयी सांगितले.
४. ऐकण्याची वृत्ती
श्लोकला खाऊ इतरांना देऊन नंतर खायला सांगितल्यावर तो ऐकतो.
५. विचारण्याची वृत्ती
एकदा तो शाळेतून आल्यावर त्याने मला ‘सर्व कपडे धुवायला ठेवू का ?’ असे विचारले. त्या वेळी माझी मैत्रीण आमच्याकडे आली होती. श्लोकचे बोलणे ऐकून तिला चांगले वाटले. ती म्हणाली, ‘‘श्लोक तुला कपडे धुण्यासाठी ठेवू का ?’, असे विचारतो. माझी मुलगी मला न विचारता सर्व कपडे असेच धुलाईयंत्रावर ठेवते.’’
६. इतरांच्या आनंदात सहभागी होणे
एकदा त्याच्या वर्गातील एका मुलीला पारितोषिक मिळाले. तेव्हा श्लोकने मला तिचे अभिनंदन करायला सांगितले.
७. चुकांविषयी संवेदनशीलता
श्लोकचा पाय एखाद्या वस्तूला लागल्यास तो लगेच नमस्कार करतो, तसेच घरातील अन्य कोणाकडून असे झाल्यास श्लोक त्यांना जाणीव करून देतो. शाळेतील मुलांकडून एखादी चूक झाल्यास श्लोक त्यांना जाणीव करून देतो. तो मला काही विचारायला आल्यावर मी त्याला रागावून बोलल्यास तो मला समजावतो.
८. व्यष्टी साधना
श्लोकला आठवण करून दिल्यावर तो अर्धा घंटा ‘श्री गुरुदेव दत्त ।’ हा नामजप करतो. तो प्रार्थना आणि कृतज्ञता व्यक्त करतो. तो स्वतःवरील त्रासदायक शक्तीचे आवरण काढतो आणि अत्तर-कापराचे उपाय करतो. मी स्तोत्र म्हणत असल्यास तो माझ्या शेजारी बसतो.
९. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या प्रती भाव
आम्ही सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा ब्रह्मोत्सव पहाण्यासाठी फोंडा, गोवा येथे गेलो होतो. तेव्हा सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे दर्शन झाल्यावर श्लोकला भावाश्रू अनावर झाले. आम्ही परतीच्या प्रवासात बसमध्ये असतांनाही त्याच्या डोळ्यांतून भावाश्रू येत होते. ‘मला बाप्पा आजोबांची आठवण येते. आपण त्यांना पुन्हा कधी भेटणार ?’, असे तो सारखा विचारत होता. (श्लोक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांना बाप्पा आजोबा म्हणतो.) ‘बाप्पा आजोबा आपल्याला सतत बघत असतात’, असा भाव ठेवून तो कृती करतो.’
– सौ. मनाली राकेश परचुलकर (कु. श्लोकची आई), बदलापूर, जिल्हा ठाणे. (१०.४.२०२४)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |
यासोबतच बालसाधकांमधील विविध दैवी पैलू सहजतेने उलगडणारी चलचित्रे (व्हिडिओज्) स्वरूपात आपण इंटरनेटवर ‘यूट्यूब’च्या https://goo.gl/06MJck मार्गिकेवरही पाहू शकता. |