कल्याण (जिल्हा ठाणे) येथील दुर्गाडी गड परिसरात बकरी ईदनिमित्त नमाजपठण !
श्री दुर्गाडीदेवीच्या मंदिरात प्रवेश नाकारल्याने शिवसेनेचे घंटानाद आंदोलन
ठाणे, १७ जून (वार्ता.) – कल्याण येथील दुर्गाडी गड परिसरात असलेल्या मशिदीमध्ये नमाजपठण केले जाते; मात्र बकरी ईदच्या दिवशी येथील श्री दुर्गाडीदेवीच्या मंदिरात दर्शनासाठी बंदी घातली जाते. या बंदीच्या विरोधात १७ जूनला दुर्गाडी गडाबाहेर शिवसेना आणि ठाकरे गट यांच्या कार्यकर्त्यांनी घंटानाद आंदोलन केले. ‘आम्हाला मंदिरात प्रवेश दिला जात नाही, तोपर्यंत आंदोलन चालूच राहील’, अशी भूमिका आंदोलनकर्त्यांनी घेतली.
Kalyan (dist. Thane) : Namaz offered in the premises of Durgadi Fort on Bakri Eid
Shiv Sena takes out ‘Ghanta Naad Andolan’ protesting Hindus’ being denied entry into the Shri Durgadi Devi Mandir during that period
In fact, a Mosque has been constructed by encroaching upon the… pic.twitter.com/o9lJLVfTIK
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) June 18, 2024
१. बकरी ईदच्या दिवशी कल्याण येथील दुर्गाडी गडावरील देवीच्या दर्शनासाठी बंदी घातली जाते. ९० च्या दशकात धर्मवीर आनंद दिघे यांनी याचा विरोध करत येथे घंटानाद आंदोलन चालू केले होते. यंदा पुन्हा येथे ठिकाणी घंटानाद आंदोलन करण्यात आले.
२. दोन्ही कार्यकर्ते एकमेकांत मिसळू नयेत अन् कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी दोन्ही गट वेगळे ठेवण्याचा पोलिसांनी प्रयत्न केला. कार्यकर्त्यांनी गडाच्या पसरात काही काळ घोषणा दिल्या. आंदोलक मोठ्या प्रमाणावर जमल्याने पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त तैनात केला होता.
संपादकीय भूमिकावास्तविक दुर्गाडी गडावर अतिक्रमण करून तेथे मशीद बांधण्यात आली आहे. तेथे मुसलमानांना अनुमती देणे आणि त्या वेळी हिंदूंना तेथील मंदिरामध्ये प्रवेश नाकारणे, ही सरकारी यंत्रणांची मोगलाई होय ! छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्रात असे होणे हिंदूंना लज्जास्पद ! |