साधना न करणारी समाजातील व्यक्ती आणि सनातनच्या नाशिक येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या साधिका (कै.) सौ. स्नेहल दिवाकर शेरीकर यांच्या अंत्यदर्शनाच्या वेळी साधकाने केलेला तौलनिक अभ्यास !
६.६.२०२४ या दिवशी नाशिक येथील सौ. स्नेहल दिवाकर शेरीकर (वय ६४ वर्षे) यांचे निधन झाले. १८.६.२०२४ या दिवशी त्यांच्या निधनानंतरचा तेरावा दिवस आहे.
‘७.६.२०२४ या दिवशी मी (कै.) सौ. स्नेहल शेरीकर यांच्या अंत्यदर्शनासाठी त्यांच्या घरी गेलो होतो. त्याच दिवशी मी समाजातील साधना न करणार्या एका व्यक्तीच्या अंत्यदर्शनासाठी तिच्याही घरी गेलो होतो. त्या वेळी मला जाणवलेली तुलनात्मक सूत्रे पुढे दिली आहेत.
वरील तुलनात्मक अभ्यास केल्यावर साधना करण्याचे महत्त्व माझ्या मनावर बिंबले. ‘साधना करणार्या प्रत्येक जिवावर गुरुकृपा असते आणि ‘साधकांच्या मृत्यूनंतरही साधकाची पुढील साधना कशी होईल ?’, याची काळजी गुरुतत्त्व घेत असते’, याची अनुभूती येऊन माझी भावजागृती झाली, तसेच माझ्याकडून प.पू. गुरुदेव अन् भगवान श्रीकृष्ण यांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त झाली.’
– श्री. नीलेश नागरे (आध्यात्मिक पातळी ६२ टक्के, वय ४३ वर्षेे), नाशिक (७.६.२०२४)
|