Mohan Bhagwat Yogi Meeting : सरसंघचालक आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची एकाच दिवसात दोनदा भेट !
लोकसभा निवडणुकीतील उत्तरप्रदेशच्या निकालावर चर्चा झाल्याचा अंदाज !
गोरखपूर (उत्तरप्रदेश) – राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प.पू. सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत हे सध्या उत्तरप्रदेशच्या दौर्यावर आहेत. १५ जूनला ते गोरखपूर येथे असतांना त्यांची उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याशी चर्चा झाली. लोकसभा निवडणुकीत उत्तरप्रदेशच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर ही भेट झाल्याचे बोलले जात आहे. लोकसभेच्या निकालानंतर संघाच्या मुखपत्रातून भाजपवर टीका होत असल्याच्या पार्श्वभूमीवर या बैठकीला महत्त्व प्राप्त झाले आहे.
Rashtriya Swayamsevak Sangh (RSS) chief H H Sarsanghchalak (Dr) Mohan Bhagwat holds closed door meet with Uttar Pradesh CM Yogi Adityanath
Expected to have discussed key reasons behind the debacle in UP Lok Sabha Elections pic.twitter.com/te7HjXbFXP
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) June 16, 2024
विशेष म्हणजे गोरखपूरमध्ये असतांना प.पू. सरसंघचालक आणि योगी आदित्यनाथ यांची दोन वेळा भेट झाली. गोरखपूर येथील कैपियरगंज आणि पक्कीबाग येथील एका शाळेत दोघा नेत्यांमध्ये ३० मिनिटांहून अधिक वेळ चर्चा झाली. भाजपच्या एका वरिष्ठ नेत्याच्या म्हणण्यानुसार, प.पू. सरसंघचालकांनी गोरखपूरमध्ये येऊन योगी आदित्यनाथ यांची घेतलेली भेट समान्य नव्हती.