महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाने केलेले काही वैशिष्ट्यपूर्ण प्रयोग !
‘यु.ए.एस्.’ या उपकरणाला ‘ऑरा स्कॅनर’ असेही म्हणतात. या उपकरणाद्वारे घटकांची (वस्तू, वास्तू, प्राणी आणि व्यक्ती यांची) ऊर्जा आणि त्यांची प्रभावळ मोजता येते. हे उपकरण भाग्यनगर, तेलंगाणा येथील माजी परमाणू वैज्ञानिक डॉ. मन्नम मूर्ती यांनी वर्ष २००५ मध्ये विकसित केले. ‘वास्तू, वैद्यकशास्त्र, पशूवैद्यक शास्त्र, तसेच वैदिक शास्त्र यांमध्ये येणार्या अडचणींचे निदान करण्यासाठी या उपकरणाचा वापर करता येतोे’, असे ते सांगतात.’
लिखाण शुद्ध का हवे ?
प्रत्येक भाषेमध्ये व्याकरण आणि शुद्धलेखन यांना विशेष महत्त्व आहे. व्याकरणातील काना, मात्रा, वेलांटी, तसेच त्यांचे र्हस्व अथवा दीर्घ उकार हे अर्थवाही आहेत. व्याकरणाच्या नियमांचे पालन झाले नाही, तर अनेकदा शब्द आणि वाक्य यांचे अर्थ योग्य रितीने कळत नाहीत. परिणामी त्यातून अयोग्य माहिती प्रसारित होते. व्याकरणाच्या प्रभावी वापरामुळे लेखन सुलभ आणि अर्थवाही होते. ‘अशुद्ध लिखाण व्याकरणाच्या नियमांप्रमाणे शुद्ध केल्यानंतर त्यात कोणता पालट होतो ?’, हे वैज्ञानिकदृष्ट्या अभ्यासण्यासाठी यु.ए.एस्. उपकरणाद्वारे चाचणी करण्यात आली.
‘शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध आणि त्यांच्याशी संबंधित शक्ती एकत्रित असतात’, या अध्यात्मातील सिद्धांतानुसार ज्या प्रकारचे लिखाण असेल, त्या प्रकारची स्पंदने त्यातून प्रक्षेपित होतात. त्यामुळे मूलतः अशुद्ध असलेल्या लिखाणामध्ये पुष्कळ प्रमाणात नकारात्मक ऊर्जा आढळली.
मराठी भाषेतील लिखाणामध्ये व्याकरणाच्या नियमांचे पालन केल्यास लिखाणात परिपूर्णता येऊन दैवी (सात्त्विक) स्पंदने आकर्षिली जातात. अशुद्ध लिखाण व्याकरणदृष्ट्या शुद्ध केल्यानंतर हाच परिणाम दिसून आला आणि त्या लिखाणात पुष्कळ सकारात्मक ऊर्जा निर्माण झाल्याचे आढळले. यातून ‘शुद्धलेखनाच्या चुका टाळल्यास लेखातील सकारात्मक स्पंदने वाढतात’, हे लक्षात येते.
– श्री. गिरीश पंडित पाटील, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा. (१६.२.२०२४)
स्त्रियांनी गडद रंगभूषा (मेकअप) का करू नये ?
सध्या बहुतांश स्त्रियांचा कल आकर्षक दिसण्याकडे असल्याने एखाद्या समारंभाला जायचे असल्यास स्त्रिया ‘हेवी मेकअप’ (गडद रंगभूषा) करतात. यामुळे त्यांच्यावर आध्यात्मिकदृष्ट्या काय परिणाम होतो?, हे विज्ञानाद्वारे अभ्यासण्यात आले. ‘स्त्रियांनी गडद रंगभूषा (हेवी मेकअप) करणे आध्यात्मिकदृष्ट्या हानीकारक आहे’, हे वैज्ञानिक चाचणीतून स्पष्ट झाले. रंगभूषेसाठीची सौंदर्यप्रसाधने आणि साहित्य यांच्यात नकारात्मक ऊर्जा (त्रासदायक स्पंदने) असल्याचे निरीक्षणांतून दिसून आले. रंगभूषेपूर्वी चाचणीत सहभागी दोन्ही स्त्रियांच्या ‘यु.ए.एस्.’ उपकरणाने केलेल्या निरीक्षणांतून त्यांच्यामध्ये नकारात्मक ऊर्जा मुळीच नसून सकारात्मक ऊर्जा आढळली. रंगभूषेनंतर नकारात्मक ऊर्जा निर्माण होऊन सकारात्मक ऊर्जा अल्प किंवा नाहीशी झाल्याचे आढळले.
– सौ. मधुरा धनंजय कर्वे, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा. (२.२.२०२१)
रत्नसंस्कार विधीमुळे घरातील नकारात्मक स्पंदने नाहीशी होऊन घरामध्ये पुष्कळ सात्त्विकता निर्माण होणे
‘रत्नसंस्कार विधीचा घरावर काय परिणाम होतो ?’, हे अभ्यासण्यासाठी विधीपूर्वी आणि विधीनंतर घराची छायाचित्रे काढून त्यांची निरीक्षणे करण्यात आली. या निरीक्षणांतून लक्षात आले की, विधीपूर्वी घरात सकारात्मक ऊर्जा काहीच नसून ७४१.५० मीटर नकारात्मक ऊर्जा होती. विधीनंतर मात्र घरातील नकारात्मक ऊर्जा नाहीशी होऊन घरात ३६१.५० मीटर एवढी सकारात्मक ऊर्जा निर्माण झाली. थोडक्यात ज्या उद्देशाने घरात रत्न संस्कार विधी करण्यात आला, तो यशस्वी झाला. हे संशोधन श्रीगुरूंच्या (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या) कृपेने यशस्वी झाले, यासाठी त्यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता !’
– श्री. धनंजय कर्वे, वास्तू अभ्यासक, फोंडा, गोवा आणि सौ. मधुरा कर्वे, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा. (२०.८.२०२३)
हाताने अन्नग्रहण का करावे ?
सध्या चमच्याने जेवण्याची मानसिकता दिसून येते. हाताने अन्नग्रहण करण्याचे सात्त्विकतेच्या दृष्टीनेही महत्त्व आहे. याविषयी ‘यु.ए.एस्.’ उपकरणाने संशोधन करण्यात आले. चमच्याने अन्नग्रहण केल्याने प्रयोगात सहभागी दोन्ही व्यक्तींच्या सूक्ष्म-ऊर्जेवर नकारात्मक परिणाम झाले. हाताने अन्नग्रहण केल्यावर त्यांच्या सूक्ष्म-ऊर्जेवर सकारात्मक परिणाम झाले. चमच्याने अन्नग्रहण करणे हानीकारक, तर हाताने अन्नग्रहण करणे लाभदायक असल्याचे सिद्ध होते. हाताने अन्नग्रहण केल्यानंतर मन तृप्त होऊन पोट भरल्यासारखे जाणवते. चमच्याने अन्न घेतांना चमच्यावर त्रासदायक शक्तीचे आवरण येते; पण बोटांनी अन्नग्रहण करतांना बोटांमध्ये कार्यरत असणारी ईश्वरी शक्ती अन्नाद्वारे पोटात जाते. चमच्याने अन्नग्रहण केल्याने मन तृप्त होत नाही. हाताने अन्न ग्रहण केल्यावर आध्यात्मिक लाभ होतात, तसे चमच्याने अन्नग्रहण केल्यावर होत नाहीत. चाचणीतील दोन्ही व्यक्तींनी चमच्याने अन्नग्रहण केल्यावर त्यांच्यावरील त्रासदायक स्पंदनांचे आवरण वाढले. त्यामुळे त्यांच्यातील नकारात्मक ऊर्जेत वाढ झाल्याचे चाचणीतून दिसून आले.
योगशास्त्रानुसार मानवी हाताची ५ बोटे, म्हणजे अंगठा, तर्जनी, मध्यमा, अनामिका आणि करंगळी अनुक्रमे आकाश, वायु, तेज, आप आणि पृथ्वी या पंचतत्त्वांचे प्रतिनिधित्व करतात. हाताची पाचही बोटे जुळवून अन्नाचा घास तोंडात घेतो, तेव्हा बोटांच्या माध्यमातून पंचतत्त्वांची शक्ती (चैतन्य) मिळते. चाचणीतील व्यक्तींना हाताने अन्नग्रहण करतांना चैतन्य मिळाल्याने त्यांच्यातील नकारात्मक ऊर्जा न्यून होऊन सकारात्मक ऊर्जा वाढली.
– सौ. मधुरा कर्वे आणि श्री. गिरीश पंडित पाटील, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, |गोवा. (२८.१०.२०२३)
भाजी सुरीने का चिरू नये ?
भाजी चिरणे, मोडणे, शिजवणे अशा सर्व कृती अध्यात्मशास्त्रदृष्ट्या योग्य पद्धतीने करणे आवश्यक असते. ‘स्त्रियांनी सुरीने भाजी कापण्यापेक्षा विळीवर भाजी चिरणे किंवा हाताने भाजी मोडणे त्यांच्यासाठी लाभदायी आहे’, हे पुढील संशोधनातून यातून लक्षात येते.
‘यु.ए.एस्.’ उपकरणाने केलेल्या परीक्षणानंतर सुरीने कापलेल्या घेवड्यामध्ये पुष्कळ प्रमाणात नकारात्मक ऊर्जा आणि अत्यल्प प्रमाणात सकारात्मक ऊर्जा आढळून आली. विळीवर चिरलेल्या घेवड्यामध्ये अल्प प्रमाणात नकारात्मक ऊर्जा आणि अधिक प्रमाणात सकारात्मक ऊर्जा आढळून आली. हाताने मोडलेल्या घेवड्यामध्ये नकारात्मक ऊर्जा काहीच नसून सर्वाधिक सकारात्मक ऊर्जा आढळून आली.
भाजी चिरण्याची कृती करतांना निर्माण होणार्या नादातून वायूमंडलात त्रासदायक स्पंदनांची निर्मिती होते. त्यामुळे भाजी त्रासदायक स्पंदनांनी भारित होते. यासाठी भाजी चिरतांना प्रार्थना आणि नामजप करत अन् सात्त्विक पद्धतीने चिरणे आवश्यक आहे.
सुरीने भाजी चिरतांना ज्या प्रकारे त्रासदायक स्पंदनांची निर्मिती होते, तशी हाताने भाजी मोडतांना होत नाही. त्यामुळे भाजी, तसेच भाजी चिरणारी व्यक्ती यांच्यावर नकारात्मक परिणाम होत नाही. सर्वच भाज्या हाताने मोडता येत नाहीत. त्यामुळे किमान हाताने मोडता येतात, अशा भाज्या तरी आवर्जून हाताने मोडाव्यात, तसेच या कृतीला प्रार्थना अन् नामजपाची जोड द्यावी. उभे राहून भाजी चिरण्यापेक्षा ज्यांना खाली बसून विळीवर भाजी चिरणे शक्य आहे, त्यांनी तसे करावे आणि जोडीला प्रार्थना अन् नामजपही करावा.
– सौ. मधुरा धनंजय कर्वे, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा. (२४.८.२०२२)
भावी ईश्वरी राज्य समर्थपणे चालवण्यासाठी उच्च लोकांतून पृथ्वीवर जन्म घेतलेल्या दैवी बालकांविषयी संशोधन !
उच्च स्वर्गलोक, महर्लाेक आणि जनलोक अशा उच्च लोकांतून पृथ्वीवर जन्माला आलेल्या बालकांची आध्यात्मिक पातळी जन्मतःच चांगली असते. या बालकांतील वैशिष्ट्यपूर्ण आध्यात्मिक गुणांमुळे ‘ही बालके दैवी आहेत’, हे लक्षात येते. ही बालके सर्वसामान्य बालकांपेक्षा निराळी आहेत. हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी ही बालके त्यांचे अमूल्य योगदान देत आहेत आणि पुढेही देणार आहेत. ईश्वरी कृपेने आध्यात्मिकदृष्ट्या असामान्य असलेल्या दैवी बालकांचा शोध घेण्याचे आणि त्यांच्याविषयी संशोधन करण्याचे कार्य चालू आहे. यामध्ये आतापर्यंत सनातन परिवारातील आणि समाजातील मिळून उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्म घेतलेली ९२५, महर्लाेकातून पृथ्वीवर जन्म घेतलेली २३०, जनलोकातून पृथ्वीवर जन्म घेतलेले अन् जन्मतःच संत असलेली २ बालके, अशी एकूण १ सहस्र १५७ दैवी बालके मिळाली आहेत.
– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
मंदिरात देवाचे भावपूर्ण दर्शन का घ्यावे ?
मंदिरात देवतेचे दर्शन घेतांना व्यक्तीच्या देवाप्रती असलेल्या भावानुसार तिला चैतन्य ग्रहण होते. हिंदु संस्कृतीमध्ये मंदिरांचे आणि मंदिरात जाऊन देवतेचे दर्शन घेण्याला महत्त्व आहे. मंदिर चैतन्यदायी ऊर्जेचे स्रोत मानले जाते. मंदिरात देवाच्या दर्शनासाठी जाणार्या भाविकांवर तेथील चैतन्याचा परिणाम होतो. चाचणीतील व्यक्तींनी देवाचे दर्शन घेतल्यावर त्यांच्या सूक्ष्म-ऊर्जेवर सकारात्मक परिणाम झाले; पण त्याचे प्रमाण निराळे आहे. चाचणीच्या वेळी अन्य व्यक्तींच्या तुलनेत देवाप्रती भाव असलेल्या व्यक्तीवर सर्वाधिक सकारात्मक परिणाम दिसून आला. व्यक्तीचा देवाप्रती जसा भाव असतो, तसे तिला चैतन्य ग्रहण करता येते. हे चैतन्य टिकवणेही आवश्यक आहे. यासाठी देवाचे दर्शन घेतल्यानंतर मंदिरात काही वेळ बसून अंतर्मुख होऊन देवतेचा नामजप करावा. त्यामुळे चैतन्य अधिक काळ टिकून राहील. – श्री. गिरीश पंडित पाटील, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा. (२६.३.२०२४)
स्त्रियांनी कुंकू का लावावे ?
‘कुंकू हे पावित्र्याचे आणि मांगल्याचे प्रतीक आहे. त्यात देवतेचे चैतन्य ग्रहण आणि प्रक्षेपण करण्याची क्षमता आहे. स्त्रियांनी भ्रूमध्यावर (कपाळावर) अनामिकेने (करंगळीच्या बाजूच्या बोटाने) कुंकू लावावे. याविषयीच्या ‘यु.ए.एस्.’ या उपकरणाच्या चाचणीत पुढील निरीक्षण झाले. कुंकवातून प्रक्षेपित होणार्या तारक-मारक चैतन्यामुळे वाईट शक्तींना स्त्रियांच्या आज्ञाचक्रातून शरिरात प्रवेश करण्यात अडथळा निर्माण होतो. कुंकवामुळे स्त्रियांभोवती चैतन्याचे कवच निर्माण होऊन त्यांचे वाईट शक्तींपासून रक्षण होते. चाचणीत सहभागी दोन्ही स्त्रियांनी कुंकू लावल्याने त्यांना चैतन्य मिळाले. त्यांच्या भोवतीचे त्रासदायक स्पंदनांचे आवरण अल्प किंवा नाहीसे होऊन त्यांची सात्त्विकता वाढली. – सौ. मधुरा कर्वे, गोवा. (२७.१२.२०२२)
काही वैशिष्ट्यपूर्ण संशोधने !१. व्यक्तींनी मद्यसेवन केल्यानंतर ‘युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर’ने घेतलेल्या चाचणीवरून लक्षात आले की, त्यांच्यातील नकारात्मकता वाढून सकारात्मकता केवळ ५ मिनिटांत पूर्णपणे नाहीशी झाली. याउलट नारळपाणी या सात्त्विक पेयाच्या सेवनानंतर व्यक्तींच्या प्रभावळीवर त्वरित सकारात्मक परिणाम झाल्याचे दिसून आले. २. ‘रोगग्रस्त अवयव नकारात्मक स्पंदने कशी प्रक्षेपित करतात’, हे दिसून आले. बालवयापासून त्वचारोगाने ग्रस्त असलेल्या व्यक्तीच्या चेहर्यावरून प्रक्षेपित होणारी नकारात्मक प्रभावळ आध्यात्मिक उपचारांनी लक्षणीयरित्या न्यून झाली, हे चाचणीतून समजले. |
www.Sanatan.org वर वाचा आणि ‘अध्यात्म अनुभवा !’