RSS Chief Mohan Bhagwat : पुढील वर्षापासून प्रारंभ होणार्या संघाच्या शताब्दी वर्षांत आपल्याला काहीतरी मोठे करावे लागेल ! – सरसंघचालक
गोरखपूर (उत्तरप्रदेश) – राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पुढील वर्षापासून प्रारंभ होणार्या शताब्दी वर्षांत आपल्याला काहीतरी मोठे करावे लागेल, असे विधान प.पू. सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी येथे केले. ते संघाच्या एका कार्यक्रमात बोलत होते.
प.पू. सरसंघचालक म्हणाले की,
१. प्रत्येक गावात शाखा स्थापन करावी लागेल. प्रत्येक वर्ग, प्रत्येक समाज आणि प्रत्येक धर्म यांचे लोक शाखेशी जोडले गेले पाहिजेत. वर्ष २०२५ पर्यंत देशात असे एकही गाव उरणार नाही जिथे रा.स्व. संघ अस्तित्वात नाही. भारतीय संस्कृती टिकवून ठेवण्यासाठी संघाला प्रत्येक गावात पोचावे लागेल. आपली भाषा आणि वागणे, यांवर संयम राखून आपण सर्वांपर्यंत पोचले पाहिजे.
२. देशावर जेव्हा जेव्हा कोणतेही संकट आले, तेव्हा स्वयंसेवकांनी धैर्याने त्याचा सामना केला; परंतु काही लोक संघाची नकारात्मक प्रतिमा समाजात निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. अशा लोकांपासून दूर राहिले पाहिजे.