पू. भगवंत कुमार मेनराय यांचे अंत्यदर्शन घेतांना साधिकेला जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती
४.६.२०२४ या दिवशी सनातनचे ४६ वे (समष्टी) संत पू. भगवंत कुमार मेनराय यांनी देहत्याग केला. त्यांचे अंत्यदर्शन घेतांना मला जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती येथे दिल्या आहेत.
१. मी पू. मेनराय आजोबांचे अंतिम दर्शन घेण्यासाठी गेल्यावर माझ्या चेहर्यावर स्पंदने जाणवली.
२. पू. आजोबांच्या पार्थिवाकडे पाहिल्यावर ‘त्यांनी देहत्याग केला आहे’, असे मला वाटत नव्हते.
३. त्यांचा देह तेजस्वी आणि शांत वाटत होता.
४. ‘त्यांच्याकडून सर्व साधकांकडे प्रीतीची स्पंदने येत आहेत’, असे मला जाणवले.
५. मला वातावरणात हलकेपणा जाणवला.
६. तेथे सेवेत असलेले सर्व जण ‘स्थिर आणि सहजभावात आहेत’, असे मला वाटले.
सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांच्या कृपेने मला या अनुभूती आल्या, त्याबद्दल त्यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता !’
– सौ. सोनाली पोत्रेकर, फोंडा, गोवा. (६.६.२०२४)
|