सातारा येथे पेट्रोलने व्यक्तीला जाळण्याचा प्रयत्न !
सातारा, १४ जून (वार्ता.) – मित्रासमवेत झालेल्या भांडणाच्या रागातून मित्राच्या वडिलांना जाळून ठार मारण्याचा प्रकार पाटखळ येथे ११ जूनच्या रात्री घडला. या प्रकरणी पोलिसांनी मुख्य संशयितांसह ४ जणांना कह्यात घेतले आहे. अनिल मधुकर शिंदे असे जळून घायाळ झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.
अनिल शिंदे यांचा मुलगा प्रज्वल आणि संशयित तरुण या दोघांची मैत्री होती. वर्षभरापूर्वी झालेल्या प्रज्वलच्या लग्नामध्ये धक्का लागल्याच्या कारणावरून संशयित तरुणासमवेत वादावादी झाली होती. त्यामुळे दोघांमध्ये बोलणे नव्हते. पूर्वीचा राग मनात धरून संशयित तरुणाने ३ मित्रांना घेऊन ११ जूनच्या रात्री १० वाजता प्रज्वलचे घर गाठले. शिंदे ५६ टक्के भाजून घायाळ झाले असल्याचे जिल्हा शासकीय रुग्णालयातील आधुनिक वैद्यांनी सांगितले.