गोहत्या आणि अवैध वाहतुकीविषयी प्रशासनाने दक्ष रहावे ! – बजरंग दलाचे निवेदन
इचलकरंजी (कोल्हापूर) – हिंदूंसाठी गाय ही महत्त्वाची असतांना महाराष्ट्रात नव्हे, तर देशात निष्पाप गाय, बैल, वासरे यांची तस्करी होते आणि पुढे जाऊन धर्मांधांकडून गायींची सामूहिक कत्तल होते. काही सणांचे औचित्य साधून मोठ्या शहरातच नव्हे, तर लहान गावातही गायी-वासरांच्या प्रचंड कत्तली होतात. कायद्याने गोहत्या बंदी असतांना आजही कोल्हापूर सांगली, मिरज, वडगाव, इचलकरंजी, निपाणी (कर्नाटक) अशा ठिकाणांहून मोठ्या प्रमाणात अवैध वाहतूक चालू असते आणि गोरक्षकांवर आक्रमणे वाढत आहेत. त्यामुळे येणार्या काळात गोहत्या आणि अवैध वाहतुकीविषयी प्रशासनाने दक्ष रहावे, असे निवेदन बजरंग दलाच्या वतीने विभागीय पोलीस अधिकारी समरसिंह साळवी यांना दिले.
या प्रसंगी निवेदन देतांना सर्वश्री शिवजी व्यास, रविकिरण हुक्कीरेकर, अमोल शिरगुप्पे, अमित पाटील, सर्जेराव कुंभार, दत्तात्रय डांगरे, उमेश संगावकर, राजेश बुग्याड यांसह अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.
संपादकीय भूमिकागोवंशहत्या बंदीचा कायदा असूनही पोलीस प्रशासन राज्यातील गोहत्या, गोतस्करी आदी बंद करण्यात अयशस्वी ठरले आहेत. आणखी किती निवेदने दिल्यानंतर पोलीस कारवाई करणार आहेत ? |