कल्याण येथील दुर्गाडी गडाचा बुरुज ढासळला !
कल्याण – येथील दुर्गाडी गडाचा एक बुरुज १३ जूनच्या रात्री ढासळला. यात कोणतीही हानी झाली नाही. पावसाच्या मार्यामुळे हा प्रकार घडला. ५ वर्षांपूर्वी गडाचे २ बुरुज ढासळल्यावर सार्वजनिक बांधकाम विभागाने त्यांची डागडुजी करून ते सुस्थितीत आणले होते; पण आता पुन्हा बुरुजावरील नवीन कामाला भेगा पडल्या आहेत. (पुरातत्व विभाग आणि सार्वजनिक बांधकाम विभाग गडाच्या दुःस्थितीकडे कधी लक्ष देणार ? – संपादक)
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गडाच्या नूतनीकरणासाठी २५ कोटी रुपयांचा निधी संमत केला होता. या निधीतील साडे सात कोटींचा निधी शासनाने प्रत्यक्ष कामासाठी संमत केला; पण वर्ष होऊनही गडाच्या संवर्धनाचे काम चालू झालेले नाही.