Modi Meets Zelensky : पंतप्रधान मोदी यांनी ‘जी ७’ शिखर परिषदेत युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेंस्की यांची घेतली भेट !
ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक, फ्रान्सचे राष्ट्रपती मॅक्रॉन, आणि इटलीच्या पंतप्रधान मलोनी यांचीही घेतली भेट !
रोम (इटली) – पंतप्रधान नरेंद्र मोदी जी-७ शिखर परिषदेसाठी इटलीत पोचले. त्यांनी येथे पहिल्याच दिवशी युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्लोदोमिर झेलेंस्की यांची भेट घेतली. बैठकीनंतर पंतप्रधान मोदी म्हणाले की, भारत युक्रेनसमवेतचे द्विपक्षीय संबंध अधिक दृढ करण्यास उत्सुक आहे.
१. ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक आणि पंतप्रधान मोदी यांच्यात द्विपक्षीय बैठक झाली. या वेळी या दोघांनी भारत आणि ब्रिटन यांच्यातील धोरणात्मक भागीदारी आणखी भक्कम करण्याचा पुनरुच्चार केला.
२. पंतप्रधान मोदी यांनी फ्रान्सचे राष्ट्रपती इमॅन्युएल मॅक्रॉन यांची भेट घेतली. दोघांनी संरक्षण, कृत्रिम बुद्धीमत्ता (एआय), तंत्रज्ञान आणि अवकाश यांसारख्या महत्त्वाच्या क्षेत्रात भागीदारी वाढवण्यासारख्या सूत्रावर चर्चा केली.
पंतप्रधान मोदी पोप फ्रान्सिस यांची भेट घेण्याची शक्यता !
पंतप्रधान मोदी कृत्रिम बुद्धीमत्ता, ऊर्जा, आफ्रिका आणि भूमध्य क्षेत्रावर लक्ष केंद्रित करणार्या सत्रात सहभागी होतील. या सत्रात पोप फ्रान्सिसही सहभागी होणार आहेत. या वेळी पंतप्रधान मोदी हे पोप फ्रान्सिस यांची भेट घेऊन त्यांच्यासमवेत द्विपक्षीय चर्चा करण्याची शक्यता आहे.