Israeli hostages : १२० इस्रायली ओलिसांपैकी किती जिवंत आहेत ?, हे ठाऊक नाही ! – हमास
तेल अविव (इस्रायल) – १२० इस्रायली ओलिसांपैकी किती जिवंत राहिले आहेत ?, हे कुणालाच ठाऊक नाही, असे विधान हमासचा प्रवक्ता ओसामा हमदान याने अमेरिकेची वृत्तवाहिनी ‘सी.एन्.एन्.’ला दिलेल्या मुलाखतीत केले आहे.
हमदान पुढे म्हणाला की, ओलिसांची सुटका करण्यासाठी कोणताही करार झाला, तर त्यात युद्धविराम आणि गाझामधून इस्रायली सैन्याच्या संपूर्ण माघाराची हमी या २ गोष्टी समाविष्ट असतील. इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्धविरामासाठी इस्रायली सैन्याला पॅलेस्टिनींचा वेढा संपवावा लागेल. तसेच बंदीवानांच्या अदलाबदलीच्या व्यवहाराबाबत हे पुढे नेले जाऊ शकते.
संपादकीय भूमिकाहमासच्या आतंकवाद्यांनी इस्रायली नागरिकांना ओलीस ठेवले आहे. त्यामुळे हमासच्या या दाव्यावर कोण विश्वास ठेवणार ? |