मिरज येथील आरोपी अहद अहमदअली शेख याने ४० लाख रुपयांच्या बनावट नोटा चलनात आणल्या !
बनावट नोटा सिद्ध करण्याचे प्रकरण
पोलिसांकडून प्रिंटर आणि भ्रमणसंगणक (लॅपटॉप) जप्त !
सांगली, १३ जून (वार्ता.) – शहरातील आकाशवाणी केंद्राजवळ बनावट नोटा चलनात आणण्यासाठी आलेला मिरज येथील आरोपी अहद अहमदअली शेख याला पोलिसांनी अटक केली होती. त्याच्याकडून पोलिसांनी प्रिंटर आणि भ्रमणसंगणक जप्त केला आहे. त्याच्याकडून आतापर्यंत ३० ते ४० लाख रुपयांच्या बनावट नोटा चलनात आणल्याची माहिती पोलीस चौकशीत समोर आली आहे. नोटा घेणार्या दलालांचा पोलीस शोध घेत आहेत, अशी माहिती पोलीस निरीक्षक संजय मोरे यांनी दिली.
पोलिसांनी शेख याला अटक केल्यानंतर ५० रुपयांच्या बनावट नोटा, स्कॅनर, प्रिंटर, कटिंग मशीन, नोटा छापण्याचा कागद, शाई असा एकूण ३ लाख ९० सहस्र रुपयांचा माल जप्त केला होता. शेख याने गेल्या ६ महिन्यांपासून बनावट नोटा छापण्यास प्रारंभ केला होता. शेख हा प्रिंटींग व्यवसायातील कुशल कारागीर होता.
संपादकीय भूमिका :प्रत्येक गुन्ह्यात धर्मांध पुढे असतात, हे सिद्ध करणारी घटना ! गुन्हा करणार्या धर्मांधांना कठोर शिक्षा करणे हाच उपाय ! |