‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’शी संबंधित सदस्यांचा जामीन न्यायालयाने फेटाळला !
देशाला इस्लामिक राष्ट्र बनवण्याचा कट रचल्याचे प्रकरण
मुंबई – बंदी घातलेल्या ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाशी संबंध असणे आणि सरकार उलथवून टाकण्याचा कट रचणे या आरोपांवरून वर्ष २०२२ मध्ये महाराष्ट्र आतंकवादविरोधी पथकाने अटक केलेल्या तिघांना मुंबई उच्च न्यायालयाने ११ जून या दिवशी जामीन नाकारला. न्यायमूर्ती अजय गडकरी आणि श्याम चंडक यांच्या खंडपिठाने नमूद केले की, आरोपींनी वर्ष २०४७ पर्यंत देशाला इस्लामिक राष्ट्र बनवण्याचा कट रचला. रझी अहमद खान, उनैस उमर खय्याम पटेल आणि कय्युम अब्दुल शेख अशी त्यांची नावे आहेत. खंडपिठाने म्हटले की, आरोपींनी राष्ट्राचे हित आणि अखंडता यांना बाधक कारवाया केल्या आहेत, याचे पुरावे आहेत.