भीतीपेक्षा प्रेमाचा धाक असावा !
लाकडाचे दोन तुकडे जोडायचे असतील, तर प्रत्येकाचा थोडा थोडा भाग तासून नंतर एकमेकांत बसवतात आणि मग उत्तम रितीने सांधा बसतो. त्याप्रमाणे प्रत्येक माणसाने आपापले दोष जर थोडे थोडे तासून टाकले, तर परस्पर प्रेमाचा सांधा खात्रीने उत्तम बसेल. याकरता विचाराने आणि काळजीने वागणे जरूरीचे आहे. घरामध्ये काय किंवा बाहेर काय, प्रेमाचा धाक असावा, भीतीचा धाक असू नये.
– ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज
(‘पू. (प्रा.) के.व्ही. बेलसरे आध्यात्मिक साहित्य’ यांच्या फेसबुकवरून साभार)