झोपडीवर ट्रक उलटून एकाच कुटुंबातील ८ जणांचा मृत्यू
हरदोई (उत्तरप्रदेश) – येथे वाळूने भरलेला ट्रक झोपडीवर उलटून झालेल्या या अपघातात एकाच कुटुंबातील ८ जणांचा जागीच मृत्यू झाला. या अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले. पोलिसांनी ट्रकचालक आणि त्याचा साहाय्यक यांना कह्यात घेतले आहे. आता या कुटुंबात एकच मुलगी जिवंत राहिली आहे. या प्रकरणी पोलीस अन्वेषण करत आहेत.