Lok Sabha Session : लोकसभेचे २४ जूनपासून पहिले अधिवेशन !

संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू

नवी देहली – १८ व्या लोकसभेचे पहिले अधिवेशन २४ जूनपासून चालू होणार आहे. संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी ही घोषणा १२ जून या दिवशी केली. पहिल्या ३ दिवसांमध्ये नवीन सदस्यांचा शपथविधी आणि लोकसभेच्या अध्यक्षांची निवड करण्यात येईल. हे अधिवेशन ३ जुलै या दिवशी संपेल.

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू २७ जून या दिवशी लोकसभा आणि राज्यसभा यांच्या संयुक्त अधिवेशनाला संबोधित करतील. त्यानंतर राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावावर चर्चा होणार आहे. आभार प्रस्तावावरील चर्चेला पंतप्रधान उत्तर देतील, असे किरेन रिजिजू यांनी त्यांच्या ‘एक्स’वरील पोस्टमध्ये म्हटले आहे.