मुंबईमध्ये लोकसभा निवडणुकीत बांगलादेशी घुसखोरांनी केले मतदान

मुंबई – मुंबईमध्ये लोकसभा निवडणुकीत मतदान करणार्‍या २ बांगलादेशी घुसखोरांच्या आतंकवादविरोधी पथकाने मुसक्या आवळल्या आहेत. बनापट पारपत्राद्वारे भारतात येऊन या घुसखोरांनी जोगेश्वरी लोकसभा मतदारसंघात मतदान केल्याचे आढळून आले आहे.

मुंबईत काही बांगलादेशी अवैधरित्या रहात असल्याची माहिती मिळाल्यानंतर आतकंवादविरोधी पथकाने सापळा रचून त्यांना अटक केली. रियाज हुसेन शेख, सुलतान सिद्धीक शेख, इब्राहिम शफिउल्ला शेख, फारूख उस्मानगणी शेख अशी घुसखोरांची नावे आहेत. या सर्वांवर गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या व्यतिरिक्त अन्य ५ जणांनी बनावट पारपत्रांद्वारे भारतात प्रवेश केल्याचे आढळून आले आहे. त्यांमधील एक जण नोकरीसाठी सौदी अरेबिया येथे गेल्याचे पोलिसांच्या अन्वेषणात आढळून आले आहे. पोलीस अन्य बांगलादेशी घुसखोरांचा शोध घेत आहेत.

संपादकीय भूमिका 

आज बांगलादेशी घुसखोरांनी मतदान केले, उद्या त्यातीलच एखादा उमेदवार झाल्यास नवल ते काय ?