गर्भलिंग निदान करणार्या डॉक्टरसह साथीदारही कह्यात !
बारामती – गर्भलिंग निदान करण्यास कायद्याने अनुमती नसतांना बारामती तालुक्यातील माळेगाव येथे डॉक्टरांसह त्याच्या साथीदाराने महिलेची गर्भलिंग चाचणी केली. या प्रकरणी दोघांच्या विरोधात माळेगाव पोलीस ठाण्यात ‘लिंग निवडीस प्रतिबंध कायद्या’न्वये गुन्हा नोंद करून दोघांना कह्यात घेतले. डॉ. मधुकर चंद्रकांत शिंदे आणि त्यांचा साथीदार नितीन घुले अशी कह्यात घेतलेल्यांची नावे आहेत. या प्रकरणी माळेगाव पोलीस ठाण्यात बारामती येथील सिल्वर जुबिली उपजिल्हा रुग्णालयाचे प्रभारी वैद्यकीय अधीक्षक डॉ. महेश सोपानराव जगताप यांनी तक्रार दिली होती. डॉक्टर आणि त्यांचा साथीदार यांच्या विरोधात पी.सी.पी.एन्.डी.टी. कायद्याच्या विविध कलमांतर्गत गुन्हा नोंद केला आहे.
संपादकीय भूमिकागर्भलिंग निदान करणे कायद्याने गुन्हा असूनही या कृत्यासाठी डॉक्टरांना शिक्षा होणे अपेक्षित ! |