अल्पसंख्यांकांच्या मतावर निवडून आल्याचा ठाकरे यांच्यावर ठपका ! – चंद्रकांत पाटील, उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री
कोल्हापूर – लोकसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे यांनी सर्वाधिक काम केले; मात्र युतीसमवेत असतांना त्यांनी २३ पैकी १८ जागा जिंकल्या. यंदाही ते पुष्कळ फिरले; मात्र ९ जागा जिंकल्या. वर्ष २०१९ मध्ये युती कायम राहिली असती, तर ज्यांना घरी जायचे होते त्यांना १३ आणि ८ जागा मिळाल्या. उद्धव ठाकरे यांनी आत्मपरीक्षण करण्याची आवश्यकता असून त्यांच्यावर अल्पसंख्यांकांच्या मतावर निवडून आले म्हणून ठपका बसला. ‘हा भगवा नाही, तर हिरवा विजय असल्याचे मनसेच्या एका नेत्याने चांगले विश्लेषण केले आहे’, असे प्रतिपादन राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले. ते कोल्हापूर येथे दौर्यावर आले असतांना पत्रकारांशी बोलत होते.
चंद्रकांत पाटील पुढे म्हणाले, ‘‘विनोद तावडे हे कर्तृत्ववान व्यक्तीमत्त्व असून त्यांना पाठवू त्या ठिकाणी यश कसे मिळेल ? हे ते पहातात. आज पक्ष चालवण्यामागे त्यांची मोठी भूमिका आहे. भाजपमध्ये पुष्कळ अधिक कार्यकर्ते असल्याने एकच व्यक्ती २ दायित्व पार पाडत नाहीत, त्यामुळे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष पालटावे लागणार आहे.’’