जागतिक पर्यावरणदिनाचे औचित्य साधून ‘आरोग्य भारती’च्या वतीने वृक्षारोपण !
निपाणी (कर्नाटक) – जागतिक पर्यावरणदिनाचे औचित्य साधून ‘आरोग्य भारती’ कोल्हापूर यांच्या वतीने ‘धन्वन्तरी आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज’ निपाणी येथे वृक्षारोपण करण्यात आले. वृक्षारोपण करतांना बिल्व, आवळा, अश्वगंधा, हिरडा, बेहडा, अर्जुन, तमालपत्र, बकुळ, शिकेकाई, नागकेशर, बहावा, सीता-अशोक, भद्राक्ष, रिठा, म्हाळुंग, कांचनार, अशा आयुर्वेदिक वनस्पतींची लागवड करण्यात आली. ‘आरोग्य भारती’च्या जिल्हाप्रमुख वैद्या अश्विनी माळकर यांनी या प्रसंगी उपस्थित विद्यार्थ्यांना सदर वनस्पतींच्या उपयुक्ततेविषयी मार्गदर्शन केले. या उपक्रमासाठी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. प्रशांत चव्हाण आणि सामाजिक वनीकरण विभागाचे सहकार्य लाभले.