कोल्हापूर जिल्ह्यामध्ये प्रथमच आयोजित ज्योतिष संमेलन उत्साहात !
कोल्हापूर – कोल्हापूर जिल्ह्यात प्रथमच आयोजित करण्यात आलेले ज्योतिष संमेलन उत्साहात पार पडले. विलासराव जाधव यांचे उज्ज्वल ज्योतिष मार्गदर्शन केंद्र, ‘वेदिया ग्राफिक्स’, अखिल भारत हिंदु महासभा आणि ‘वैदिक सनातनी ट्रस्ट’ यांच्या संयुक्त विद्यमाने याचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी ‘वेदिया ग्राफिक्स’चे श्री. शरद ठाणेकर, अखिल भारत हिंदु महासभेचे जिल्हाध्यक्ष श्री. संदीप सासणे, महिला आघाडीच्या शोभाताई शेलार, ‘वैदिक सनातन ट्रस्ट’चे श्री. अविनाश शेलार-सरनोबत यांसह अन्य उपस्थित होते.
दीपप्रज्वलन झाल्यावर स्वामी विवेकानंद यांच्या मूर्तीस पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाचा प्रारंभ झाला. ज्योतिष आचार्य विलासराव जाधव, प्रमुख पाहुणे विजयानंद पाटील, नाशिकहून आलेले मनीष शास्त्री-गोसावी यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. श्री. विजय गुरव यांनी आभार मानले.